JNU Attack : नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:54 PM2020-01-08T12:54:39+5:302020-01-08T12:59:17+5:30

JNU Protest : जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताच दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल

Hopefully Rahul will be PM one day deepika padukones old video goes viral after she extends support to jnu students | JNU Attack : नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल

JNU Attack : नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल

Next

नवी दिल्ली: अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यानंतर भाजपाचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाची जेएनयू परिसरातील उपस्थिती राजकीय स्वरुपाची असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी हा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलं. 

आपण निर्भीडपणे आपलं मत मांडत आहोत, हे पाहून मला अभिमान वाटतो, असं दीपिकानं जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं. लोक समोर येऊन आणि कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवत आहेत. हा निर्भीडपणा कौतुकास्पद आहे, असंदेखील दीपिका म्हणाली. यावेळी दीपिकानं कोणतंही राजकीय विधान केलं नाही. मात्र दीपिकाच्या जेएनयूमधील उपस्थितीनंतर तिची 2010 मधील एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्या मुलाखतीत दीपिकानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. 



'मला राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही. मी टीव्हीवर राजकारणाबद्दलच्या थोड्या फार घडामोडी पाहते. राहुल गांधी आपल्या देशासाठी जे करत आहेत, ते एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत. एक दिवस ते पंतप्रधान होतील, अशी आशा आहे,' असं दीपिकानं ९ वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला वाटतं. ते तरुणांशी उत्तमपणे संवाद साधतात. त्यांचे विचार पारंपारिक आहेत. याशिवाय त्यांचा दृष्टीकोन भविष्यवेधी आहे. देशासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे,' अशा शब्दांत दीपिकानं राहुल यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. 

Web Title: Hopefully Rahul will be PM one day deepika padukones old video goes viral after she extends support to jnu students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.