नवी दिल्ली: अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यानंतर भाजपाचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाची जेएनयू परिसरातील उपस्थिती राजकीय स्वरुपाची असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी हा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलं. आपण निर्भीडपणे आपलं मत मांडत आहोत, हे पाहून मला अभिमान वाटतो, असं दीपिकानं जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं. लोक समोर येऊन आणि कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवत आहेत. हा निर्भीडपणा कौतुकास्पद आहे, असंदेखील दीपिका म्हणाली. यावेळी दीपिकानं कोणतंही राजकीय विधान केलं नाही. मात्र दीपिकाच्या जेएनयूमधील उपस्थितीनंतर तिची 2010 मधील एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्या मुलाखतीत दीपिकानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचं कौतुक केलं होतं.
JNU Attack : नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:54 PM