Karnatak Accident: कर्नाटकता बस अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चिक्कमंगळुरूमध्ये हा मोठा रस्ता अपघात झाला. कर्नाटक परिवहन मंडळाची बस नियंत्रणाबाहेर गेली आणि खड्ड्यात पडली. अपघातग्रस्त बस एका घराच्या जाऊन आदळली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस चालकाला दुखापत झाली असून प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुधवारी चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील जलदुर्गा गावात कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची बस एका घराच्या छतावर आदळली. चिक्कमंगलुरूहून श्रृंगेरीकडे जाणारी बस कोप्पा तालुक्यातील जयपुराजवळ पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घसरली आणि थेट घराच्या छतावर जाऊन आदळली. या अपघातात बस चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले, तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताच्या वेळी परिसरात हलका पाऊस पडत होता, ज्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस खड्ड्यात पडली आणि जवळच्या घराच्या छतावर आदळली. या अपघातात घराच्या छताचेही नुकसान झाले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात एकूण ४० प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, दहा जखमींना जयपुरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर बस चालकासह दोघांना कोप्पा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिक लोकही तातडीने मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर काही स्थानिक रहिवाशांनी आरोप केला की बस खूप वेगात जात होती आणि जास्त वेगामुळे हा अपघात झाला. तसेच, बस जुनी होती आणि तिची देखभाल योग्य प्रकारे केली जात नव्हती, असाही आरोप करण्यात आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जयपुरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये घटनेची भीषणता दिसत आहे.