वरवडे गावातील विकासकामांची घोडदौड
By admin | Published: February 20, 2016 2:01 AM
वरवडे गावातील विकासकामांची घोडदौड
वरवडे गावातील विकासकामांची घोडदौडकुलदैवत - खंडोबा (फोटो )सरपंच- सौ. शोभा घाडगे (फोटो)उपसरपंच- र्शी. नागन्नाथ पाटीलवरवडे (प्रतिनिधी) - व्यक्तिगत सुखापेक्षा सार्वजनिक सुखाला महत्त्व देणारी माणसं कर्तृत्ववान, मोठी असतात. त्यापैकी शोभाताई व उपसरपंच नागन्नाथ पाटील, गावकर्यांच्या पुढाकाराने वरवडे, ता. माढा गावातील विकासकामांची घोडदौड स्मार्ट सोलापूरच्या दिशेने होत आहे, याचा व्यक्तिश: मला व गावकर्यांना सार्थ अभिमान आहे.ग्रामदैवत - र्शी खंडोबा, लोकसंख्या- 2505, शिक्षणाचे प्रमाण - 80 टक्के, पुरुष- 1327, महिला- 1178, पाण्याचे स्रोत- गाव विहीर, हातपंप.ग्रामपंचायत पदाधिकारी -सरपंच- सौ. शोभा दीपक घाडगे, उपसरपंच- र्शी. नागन्नाथ साहेबराव पाटील, सदस्य - सौ. आशा गायकवाड, सौ. पल्लवी गायकवाड, सौ. सखुबाई कसबे, सौ. प्रियंका नरळे, र्शी. प्रदीप वजाळे, र्शी. शिवाजी गायकवाड, र्शी. रविकांत मेणकुदळे.ग्रामसेवक- र्शी. कालिदास मोहिते, सेवक- र्शी. दीपक भोसले, र्शी. मनीष वजाळे.शैक्षणिक सुविधा -वरवडे गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. म. फुले व विनायक विद्यालय आहे.वैशिष्ट्ये :-ज्वारी व कांद्याचे सर्वाधिक पीक, शासकीय, निमशासकीय सेवेत 175 युवक कार्यरत, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, दूध संकलन दररोज 5000 लिटर.विकास -दलित वस्ती व गावातील अंतर्गत गटारी पूर्ण केल्या. गल्लोगल्ली पाण्याची सोय होण्यासाठी लहान-लहान पाणीपुरवठा योजना सुरू केल्या. आमदार फंडातून सभामंडप उभारले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून र्शी खंडोबा देवस्थानसाठी यात्री निवास बांधले, दलित वस्तीकरिता स्मशानभूमीचे काम पूर्ण केले, मुस्लीम समाजासाठी नमाज पढण्याकरिता 2 गुंठे जागा उपलब्ध करून दिली. खासदार फंडातून एस. टी. पिकअप शेड/हायमास्ट पोल उभारले.अपेक्षित विकास - हागणदारीमुक्त गाव करणे, दलित वस्तीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देणे, मातंग समाजासाठी सभामंडप उभारणे, गावालगत 20 ते 25 खेडी असल्याने आठवडा बाजार भरविणे, जिल्हा परिषद शाळा/ग्रामपंचायत कार्यालय लोकवर्गणीतून आयएसओ मानांकन करण्याचा मानस आहे. लहान-मोठय़ा उद्योगासाठी व्यापारी संकुलन उभारणे, जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबविणे, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम करणे, वरवडे ते तुळशी (पालखी मार्ग) रस्ता डांबरीकरण करणे, वृक्षारोपण व संवर्धन याकडे विशेष लक्ष राहील.