काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:19 AM2024-08-24T06:19:32+5:302024-08-24T06:20:06+5:30

नॅशनल काॅन्फरन्सच्या सकिना इट्टू यांनी दमहाल हंजीपाेरा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Horses fray for 10 seats in Congress-NC; The leaders of the parties stopped, the discussion started from the party elites | काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू

काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू

- सुरेश डुग्गर

श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल काॅन्फरन्स आणि काॅंग्रेसने आघाडी केली असून, बहुतांश विधानसभा मतदारसंघांत जागावाटप निश्चित झाले असून, काही जागांसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, त्याचवेळी आघाडीवरून काॅंग्रेसमध्ये अंतर्गत विराेध सुरू झाला असून, नॅशनल काॅन्फरन्सने मागितलेल्या १० जागांवर काॅंग्रेसमधून विराेध हाेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नॅशनल काॅन्फरन्सच्या सकिना इट्टू यांनी दमहाल हंजीपाेरा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासाेबत आलेले पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, बहुतांश ठिकाणी जागावाटप निश्चित झाले आहे. काही जागांवर सहमती झालेली नाही. काही जागांवर दाेन्ही पक्ष अडून आहेत. यासंदर्भात चर्चा करू, असे अब्दुल्ला म्हणाले. 

काेणत्या जागांसाठी दाेन्ही पक्ष अडले?
नगराेटा, रायपूर, दाेमाना, विजयपूर, नाैशेरा, सुंदरबनी, चिनाब खाेऱ्यांसह १० जागांवर दाेन्ही पक्ष अडले आहेत. काही ठिकाणी काॅंग्रेसचे स्थानिक नेते, तर काही ठिकाणी आम्ही अडलेलाे आहाेत. या जागांसाठी चर्चा सुरू असल्याचे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

Web Title: Horses fray for 10 seats in Congress-NC; The leaders of the parties stopped, the discussion started from the party elites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.