उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन न मिळाल्याने एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह बाईकवरून सुमारे 10 किलोमीटरपर्यंत घेऊन जावा लागला. इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थिनीला पेपर चांगला गेला नव्हता. विद्यार्थिनीला याची काळजी वाटत होती, त्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केली. नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयात वाहन न मिळाल्याने विद्यार्थिनीच्या भावाने मृतदेह बाईकवरून घरी आणला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारवारी नगरपालिकेतील आंबेडकर नगर येथील आहे.
विद्यार्थिनीला पेपर खराब केला होता, त्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला. गुरुवारी विद्यार्थिनीने तिच्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब नातेवाईकांना समजताच त्यांनी मुलीला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर मृताच्या भावाने मृतदेह नेण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडे वाहनाची मागणी केली, मात्र अर्धा तास प्रतीक्षा करूनही वाहन मिळाले नाही.
भावाने बहिणीचा मृतदेह बाईकवरून नेला. होळीपूर्वी झालेल्या परीक्षेत बहिणीचे काही पेपर चांगले गेले नसल्याचं भावाने सांगितले. त्यामुळे ती तणावात होती. याच कारणावरून तिने हे पाऊल उचलले. आम्ही तिला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात वाहनाची वाट पाहिली, मात्र वाहन न मिळाल्याने मृतदेह बाईकवरून आणण्यात आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"