शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भयानक! पतीसमोरच हॉस्पिटल कर्मचाऱ्यानं पत्नीचा विनयभंग केला तरीही...; मन सुन्न करणारी कहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 18:29 IST

उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या स्टाफने तिचा विनयभंग केला. पैशांसाठी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या सर्व कटू गोष्टी आठवून रुचिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं

ठळक मुद्देरुचीने जे सहन केलंय ते भयानक आहे. तिने तिच्या पतीच्या डोळ्यात ऑक्सिजन संपण्याची भीती पाहिली होती.कोरोना झाला तर त्यातून वाचू शकतो परंतु हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे जीव जाणे निश्चित आहे.९ एप्रिलला पती रोशनला सर्दी ताप आला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.

पटणा – कोरोना महामारीनं लोकांना केवळ शारिरीक, मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे त्यासोबतच अशा संकटात माणुसकीला लाजवणारी घटनाही पाहायला मिळत आहे. अशीच एक कहानी आहे रुची आणि रोशनची. रुची २६ दिवस तिचा पती रोशनसाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनाशी लढत होती तरीही पतीला वाचवू शकली नाही.

उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या स्टाफने तिचा विनयभंग केला. पैशांसाठी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या सर्व कटू गोष्टी आठवून रुचिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. रुचीने जे सहन केलंय ते भयानक आहे. तिने तिच्या पतीच्या डोळ्यात ऑक्सिजन संपण्याची भीती पाहिली होती. पटनाच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनचा काळा बाजार सुरू होता. रुचीने पती रोशनच्या जीवासाठी ते खरेदीही केले परंतु पतीला वाचवू शकली नाही.

रुचीने डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणाबद्दल एका हिंदी चॅनेलला मुलाखत दिली. त्यात म्हटलंय की, कोरोना झाला तर त्यातून वाचू शकतो परंतु हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे जीव जाणे निश्चित आहे. २६ दिवसांपर्यंत नवऱ्यासोबत सावलीने असलेल्या रुचीला शेवट नवऱ्याला वाचवता आलं नाही. रुची तिच्या नवऱ्यासोबत कुटुंबाला भेटण्यासाठी भागलपूरला आली होती.

९ एप्रिलला पती रोशनला सर्दी ताप आला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. रुचीच्या नवऱ्याच्या देखभालीसाठी हॉस्पिटलमध्ये कायम होती. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी ज्योती कुमारने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ते तिच्या पतीने पाहिलं. परंतु बेडवर खिळलेला पती काहीच करू शकला नाही. डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार न झाल्याने रुचीला मायांगज हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. त्याठिकाणी बिकट अवस्था होती. ICU मध्ये एकामागोमाग एक रुग्ण मरत होते. कोणी काहीही ऐकत नव्हतं. रुचीने सांगितले की, एक व्यक्ती डॉक्टर डॉक्टर ओरडून खाली पडला आणि त्याचे डोके फुटले. सगळीकडे रक्त उडालं. तरीही डॉक्टरांना फरक पडला नाही. डॉक्टर आणि नर्स त्यांच्या रुममध्ये मोबाईलवर पिक्चर बघत होते परंतु रुग्णाला बघण्यासाठी कोणीच आलं नाही असा आरोप करण्यात आला.

रुचीची मोठी बहिण ऋचा सिंहने आरोप केला की, हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफ वाईट नजरेने पाहायचे. अनेकदा त्यांनी अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मायागंज हॉस्पिटलमधून एअर एम्ब्युलन्सने दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला परंतु एम्ब्युलन्स मिळाली नाही त्यामुळे पटना येथील खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं. याठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं सांगत स्वत: हॉस्पिटल ऑक्सिजन सिंलेडर ५० हजार रुपयांना विकत होतं.

रोशन आणि रूची नोएडा येथे राहत होते. रोशन सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. परंतु पैसा असूनही रोशनला मृत्यूपूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रोशनचा मृत्यू हॉस्पिटलमधील गैरव्यवस्थापन आणि ऑक्सिजन संपण्याची भीती यामुळे झाली आहे. रुची आणि रोशन ५ वर्षापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकले होते. रोशनच्या आठवणीत रुचीला अश्रू अनावर होत होते. २६ दिवसांच्या या कालावधीत हॉस्पिटलला राहिली परंतु पतीला वाचवू शकली नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या