भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 23 लाख 32,908 इतकी झाली आहे. त्यापैकी 16 लाख 40,362 रुग्ण बरे झाले असून 46,216 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसपासून आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सफाई कामगार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली व काहींना प्राणही गमवावे लागले. अशीच एक घटना पंजाबपोलिसांत घडली. पंजाब येथील पयाल ग्रामीण उपविभागीय चौकीत सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या जस्पाल सिंह यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. सिंह यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्काच होता, पण त्यांच्यासमोर तासाभरात आणखी एक संकट आलं. जस्पाल सिंह यांच्या निधनाच्या धक्क्यानं त्यांच्या अंध मुलीनंही जीव सोडला.
संजय दत्तला कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत जाता येणार नाही? जाणून घ्या कारण
जस्पाल सिंह त्यांच्या मुलींना 'Mota Putt' असे लाडाने म्हणायचे... तिला मंच्युरियन खायला आवडते आणि मुलीनं फर्माइश केल्यास ते लुधियाना शहरात जायचे. 18 वर्षांपासून ती किशोर मधुमेहाशी संघर्ष करत आहे आणि त्यामुळे तिची किडनी निकामी झाली आणि दृष्टीही गमावली. जस्पाल यांचा अधिक वेळ तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यातच जात होता. सोमवारी 49 वर्षीय जस्पाल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तासाभरातच त्यांची 24 वर्षीय मुलगी नवप्रीत कौर हिनं घरी प्राण सोडले. वडीलांच्या जाण्यानं ती खुप खचली होती. काही मिनिटांनी ती जमिनीवर कोसळली, बेशुद्ध झाली आणि धक्क्यानं तिचेही निधन झालं.
धक्कादायक; मुंबईकर क्रिकेटपटूची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास
''त्यांच्यातील नातं अतूट होतं... नवप्रीतला जराही त्रास झालेलं, वडीलांना पाहवत नसे. 8 वर्षांची असाताना तिला मधुमेह झाला. त्यानंतर 18 वर्ष तिला एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या अशीच त्यांची धावपळ सुरू होती. माझ्या बहिणीला बरं वाटावं म्हणून त्यांनी सर्व कमाई खर्ची घातली आणि कर्जही घेतलं, परंतु तिची प्रकृती बिघडतच गेली. सोमवारी वडीलांवर अंत्यसंस्कार करून आम्ही घरी परतलो. घरातील प्रत्येक जण रडत होतं आणि असं का होतंय, हे जाणून घेण्यासाठी ती सर्वांना विनंती करत होती. वडिल कुठे आहेत, हे तिनं विचारलं आणि त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. तासाभरात तिनंही प्राण सोडले,''असे जस्पाल यांचा मुलगा शरणदीप सिंह यानं सांगितलं.
लुधियाना येथील पोलीस लाईन्स येथे त्यांची पोस्टींग होती. मार्च महिन्यात त्यांच्यावर क्षयरोगाचा उपचार झाला होता. त्यांना मधुमेहही होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवरही झाला होता. काही दिवस ते वैद्यकिय रजेवर होते आणि 24 जुलैला ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. 27 जुलैला त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर ते सेल्फ आयसोलेट झाले होते.
अन्य महत्त्वाचे बातम्या
अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह!
खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल
IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल
बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR
अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral