कोलकाता : बेलियाघाट येथील प्रसिद्ध ‘गांधी भवन’पासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर एक दुमजली घर आहे, ‘महात्मा नथुराम गोडसे हाऊस’ असे त्याचे नाव आहे. महात्मा गांधींनी १९४७ मध्ये प. बंगालमधील हिंदू-मुस्लिमांच्या दंगली थांबविण्यासाठी ज्या ठिकाणी उपोषण केले होते, त्या इमारतीला ‘गांधी भवन’ असे संबोधले जाते.डमडमजवळील मायकेलनगर येथे वास्तव्याला राहिलेले नौदल कमांडर राणाप्रताप रॉय यांनी एकेकाळी कच्छच्या रणात पाकिस्तानी सैनिकांशी दोन हात केले होते. रॉय हे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला आदर्श मानायचे. त्यामुळेच त्यांनी आपल्या दुमजली घराचे नाव महात्मा नथुराम गोडसे भवन असे ठेवले. अजूनही काळ्या संगमरवरी दगडात सोनेरी अक्षरातील हे नाव लक्ष वेधून घेत आहे. या घराला बांधून ४० वर्षे झाली असली तरी त्याच्यावरील नावामुळे कोणताही वाद नाही. कुणाच्या ते लक्षातही आले नाही. राजस्थानमधील एका पुलाला गोडसेचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)
‘त्या’ घराचे नाव आहे ‘महात्मा नथुराम गोडसे’
By admin | Published: February 09, 2015 12:16 AM