शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

घर सांभाळणाऱ्या महिलेचा पतीच्या मालमत्तेत समान वाटा, मद्रास हायकोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 8:02 AM

Court: गृहिणी घराची काळजी घेते. पतीला घराची चिंता न करता कामासाठी बाहेर पडण्यास मदत करून, अप्रत्यक्षपणे उत्पन्नात योगदान देते. त्यामुळे ती पतीच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्यास पात्र आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे.

- डॉ. खुशालचंद बाहेती

चेन्नई - गृहिणी घराची काळजी घेते. पतीला घराची चिंता न करता कामासाठी बाहेर पडण्यास मदत करून, अप्रत्यक्षपणे उत्पन्नात योगदान देते. त्यामुळे ती पतीच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्यास पात्र आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे.

कन्नयन नायडू आणि भानुमती यांचे लग्न झाले. पुढे कन्नयन सौदी अरेबियात नोकरीसाठी गेले. भानुमती मुलांसह येथेच राहिली. भानुमतीला स्वतःचे कोणतेही उत्पन्न नव्हते. सौदीहून पतीने पाठवलेल्या पैशातून तिने दागिने आणि काही स्वतःच्या नावावर, तर काही पतीच्या नावाने मालमत्ता खरेदी केल्या.

परतल्यानंतर दाम्पत्यामध्ये वाद झाला. पतीने भानुमती यांना सर्व मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिनेही मागितले. भानुमती यांनी यास विरोध केला आणि मालमत्तेत समान वाटा मागितला. प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, कन्नयन यांनी युक्तिवाद केला की, भानुमतीला स्वतःचे उत्पन्न नाही. सर्व काही त्यांच्या पैशाने विकत घेतले आहे. सौदी अरेबियातून पती सर्व मालमत्तेचे खरे मालक तेच आहेत.  भानुमती यांनी मात्र पत्नी म्हणून संपत्तीवर तिचा ५० टक्के अधिकार असल्याचा दावा केला.

गृहिणी अप्रत्यक्षरीत्या का असेना, तितक्याच प्रमाणात कुटुंबाला हातभार लावते. ती घराची काळजी घेते. पती- पत्नीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संयुक्त योगदानाद्वारे मालमत्ता संपादन केली असल्यास, दोघांना समान वाटा मिळण्याचा हक्क आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने भानुमतीच्या बाजूने  निकाल दिला. 

गृहिणीच्या योगदानाला मान्यता देणारा कोणताही कायदा भारतात आतापर्यंत नाही. परंतु न्यायालय अशा योगदानाला मान्यता देते. पती आणि मुलांची काळजी घेण्यासाठी पत्नी स्वतःला वाहून घेते. तिला स्वतःचे म्हणता येणारे काहीही नसणे हे अन्यायकारक आहे. -न्यायमूर्ती कृष्णन रामासामी

टॅग्स :Courtन्यायालयrelationshipरिलेशनशिप