नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देश आणि राज्यासमोर संकट निर्माण झाले आहे. आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे. गरिबांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे.
केंद्र सरकारने नुकतीच 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया.
रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी 'या' कागदपत्रांची आहे आवश्यकता
- रेशन कार्डमध्ये घरातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड असणं अनिवार्य आहे. याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आणि आईवडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- घरामध्ये लग्न करून आलेल्या सुनेचं रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं असेल तर तिचं आधार कार्ड आणि पतीच्या रेशन कार्डची फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. यासोबतच माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचं प्रमाणपत्र देखील असावं.
घरबसल्या ऑनलाईन अशी अपडेट करा माहिती
- घरबसल्या रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल.
- लॉगिन आयडी तयार केल्यावर वेबसाईटच्या होमपेजवर आपल्या नव्या सदस्याचे नाव टाकण्याचा एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.
- ओपन झालेल्या फॉर्ममध्ये कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती भरा.
- फॉर्मसह आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ज्याच्यामदतीने नंतर फॉर्म ट्रॅक करू शकता.
- फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकार व्हेरिफाय करतील. जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य असेल तर फॉर्म अॅसेप्ट करण्यात येईल आणि पोस्टाद्वारे रेशन कार्ड घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य
"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"
CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान