शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कमांडो असून एवढे घाबरता कशाला; पाकिस्तानी न्यायालयाचा परवेझ मुशर्रफ यांना खोचक सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 9:46 AM

 मी परत येईन, अशी राजकारण्यासारखी पोपटपंची करणे सोडून मुशर्रफ यांनी देशात परत यावे.

इस्लामाबाद: एखादा कमांडो स्वत:च्याच देशात यायला इतका कसा काय घाबरू शकतो, असा खोचक सवाल पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना विचारला. मुशर्रफ यांना २०१३मध्ये पेशावर हायकोर्टाने निवडणूक लढवण्यास आजन्म अपात्र ठरवले होते. मुशर्रफ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या मुशर्रफ हे अरब अमिरातीमध्ये वास्तव्याला आहेत. पुरेशी सुरक्षा दिली तरच पाकिस्तानमध्ये परतेन, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा दिली होती. मात्र, त्यासाठी बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली होती. या सुनावणीला मुशर्रफ उपस्थित राहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने लष्कराचे कमांडो असूनही देशात यायला इतके घाबरता का, असा सवाल त्यांना विचारला.  मी परत येईन, अशी राजकारण्यासारखी पोपटपंची करणे सोडून मुशर्रफ यांनी देशात परत यावे. किंबहुना परवेझ मुशर्रफ कमांडो असतील तर त्यांनी देशात येऊनच दाखवावेच, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. दरम्यान, मुशर्रफ यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आजपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट अनब्लॉक करुनही ते न्यायालयात आले नाहीत. मुशर्रफ यांच्या वकिलांनी मुशर्रफ यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कोर्टाने नाराजी व्यक्त करून मुशर्रफ यांच्या अटी-शर्तींना कोर्ट बांधील नसल्याचे सांगितले. 

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफcommandoकमांडोPakistanपाकिस्तान