शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

माझा इमिग्रंट व्हिसा लवकर कसा प्रोसेस होऊ शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 2:36 PM

इमिग्रंट व्हिसा विलंब होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे तुमच्या (I-८९४) च्या प्रमाणार्थ तुम्ही दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असणे.

प्रश्न : माझ्या व्हिसा प्रकरणात विलंब होणार नाही, यासाठी माझ्या इमिग्रंट व्हिसाच्या मुलाखतीची तयार कशी करावी ? उत्तर : तुमचे मुलाखत वेळेचे पत्र अत्यंत बारकाईने वाचा. या पत्राद्वारे तुम्हाला कोणत्या मुद्यांची तयारी मुलाखतीसाठी करायची आहे, ते समजेल. तसेच आमची वेबसाइटही पाहा. याद्वारे तुमच्या ‘इमिग्रंट व्हिसा अर्जाच्या अपॉइंटमेंट पॅकेज’ कागदपत्रांची माहिती मिळेल. याला ‘पॅकेट फोर’ असेही म्हणतात. या कागदपत्राद्वारे मुलाखत प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची माहिती मिळतानाच तुमच्या मुलाखतीचे शेड्युल्ड आणि मुलाखतीची तयारी याची तपशिलात माहिती मिळेल. प्रश्न : मी ‘पॅकेट फोर’मधील सूचनांचे पालन केले आहे. मी आणखी काय करू शकतो? उत्तर : तुमच्या मुलाखतीची तयारी करताना सर्व कागदपत्रे मुदतीत आहेत, तसेच त्यांची मुदत संपलेली नाही याची दोनदा खातरजमा करा. अर्जदार जेव्हा मुलाखतीसाठी मुदत संपलेल्या कागदपत्रांसह येतो, तेव्हा इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेला विलंब होतो आणि हेच विलंबाचे सर्वात प्रमुख कारण आहे. तुमचे पोलीस प्रमाणपत्र, जे प्रादेशिक पारपत्र कार्यालयातून येणे गरजेचे आहे आणि ते जारी केलेल्या तारखेपासून दोन वर्षे मुदतीच्या आतील हवे. तुमचे वैद्यकीय प्रमाणपत्र जे जारी केलेल्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीमधील हवे. प्रश्न : माझी कागदपत्रे वैध आहेत. आणखी काही? उत्तर : इमिग्रंट व्हिसा विलंब होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे तुमच्या (I-८९४) च्या प्रमाणार्थ तुम्ही दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असणे. तुमच्या अपॉइंटेमेंटपूर्वी, तुमच्या पीटिशनर आणि / किंवा जॉइंट स्पॉन्सरने I-८६४, I-८६४ A पूर्ण केल्याची खात्री करा. तसेच त्याने त्यासाठी आवश्यक अशी सर्व पूरक कागदपत्रे दिलेली आहेत याची खातरजमा करा. पीटिशनर किंवा जॉइंट स्पॉन्सरचा उत्पन्न तपासण्याचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे त्यांनी सादर केलेल्या ताज्या IRS टॅक्सचा तपशील. हा तपशील ऑनलाइन प्राप्त करता येतो. जर पीटिशनर किंवा जॉइंट स्पॉन्सरने IRS टॅक्सचा तपशील सादर केलेला नसेल तर त्या दोघांनी त्यांचे कर विवरण सादर करणे (IRS form 1040) आणि अनुषंगिक W-2 फॉर्म्स करणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आहे. जर तुमची पीटिशन दाखल करून अनेक वर्षे उलटून गेलेली असतील तर अधिक ताजी कर तसेच वित्तीय कागदपत्रे अपलोड करावीत. तुमचे प्रतिज्ञापत्र, अनुषांगिक कर तसेच वित्तीय कागदपत्रे पूर्ण आणि बिनचूक असल्याची खात्री  करा. तुमच्या व्हिसा अर्ज प्रक्रियेतील विलंब टाळण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 

महत्त्वाची सूचनाव्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचे योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचे स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :Visaव्हिसाAmericaअमेरिकाLokmatलोकमत