मुंबई - सध्या प्रत्येक महत्त्वाच्या कामांमध्ये आधार कार्डचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सिम कार्ड घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. पण बँक, गॅस सिलिंडर यांसारखी कामं आजही आधार कार्डशिवाय पूर्ण करता येणे अशक्य आहे. हल्ली बऱ्याच जणांचा घराचा पत्ता बदलल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश जणांनी फार पूर्वीच आपले आधार कार्ड बनवून घेतले असल्यास आणि पत्ता बदलल्यामुळे त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या असतील, तर चिंतेचं काहीही कारण नाही. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज नाही. तर घरी बसल्याही आधार कार्डवरील पत्ता अगदी सहज बदलता येऊ शकतो.
जाणून घेऊया ऑनलाइन प्रक्रिया 1. UIDAIच्या https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर जावं लागेल. तेथे Aadhaar Online Services या पर्यायावर क्लिक करुन Aadhaar Update सेक्शनमध्ये जावं लागेल आणि मग Address Update Request (Online) वर क्लिक करावे.
2. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल. ज्यामध्ये काही निर्देशांसहीत अपडेट अॅड्रेसचा पर्याय मिळेल. अॅड्रेस अपडेटसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. कारण याच क्रमांकावर अपडेटसाठी ओटीपी पाठवण्यात येईल.
3. यानंतर अपडेट अॅड्रेसच्या पर्यायावर क्लिक करा आणि आपला आधार कार्ड क्रमांकाद्वारे लॉगिन करा. आता तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल.
4. हा ओटीपी क्रमांक तेथे सबमिट करा आणि डाटा अपडेट रिक्वेस्ट (Data Update Request)वर क्लिक करा. अॅड्रेस या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला Aadhaar Update चा पर्याय समोर दिसेल. यानंतर तुमचा नवीन पत्ता अपडेट करा आणि सबमिट अपडेट रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करा.
5. डाटा अपडेट रिक्वेस्टनंतर तुम्हाला काही कागदपत्रंही द्यावी लागतील. यामध्ये पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, बँक पासबुक, पोस्ट ऑफिस अकाऊंट पासबुक, मतदार ओळखपत्र इत्यादींचा समावेश असेल. या कागदपत्रांवर तुम्हाला स्वाक्षरीही करावी लागणार आणि मग या कागदपत्रांची फोटोकॉपी अपलोड करावी. यातील कोणतेही एकच कागदपत्रं पुरावा म्हणून सबमिट करावा. सर्व कागदपत्रं अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
6. यानंतर बीपीओ सर्विस प्रोव्हायडर निवडा आणि रिक्वेस्ट सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट क्रमांक प्राप्त होईल. या क्रमांकाच्या मदतीनं रिक्वेस्टची एक्नॉलेजमेंट कॉपी डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या. रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर काही दिवसांनंतर तुमचा नवीन पत्ता आधार कार्डवर अपडेट होईल आणि ई-मेल किंवा मोबाइलवर याची तुम्हाला माहिती पुरवण्यात येईल.