गुरुग्राम: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. तिन्ही कायदे मागे घ्या ही या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांना संभ्रमित करण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. मात्र आता एका व्हिडीओमुळे भाजप अडचणीत आला आहे."माझी वेळ संपत आलीय"; शेतकरी नेत्यानं भाषणाला पूर्णविराम दिला अन् श्वासही थांबलाहरयाणात कृषी कायद्यांबद्दल संवाद साधण्यासाठी भाजपकडून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तळागाळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. 'कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आमचं ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ दिल्या जाणाऱ्या तर्कांच्या आधारावर ते बोलत नाहीत. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल,' असं भाजपचा एक कार्यकर्ता व्यासपीठावरील नेत्यांना सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.