देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात लोकांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक राज्यात दारूची दुकानेही उघडली गेली. सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही ठिकाणी दारूच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. जी सहसा पाहिली किंवा ऐकली जात नाही. कोलारच्या मिस्तोरी गावात एका मद्यधुंद व्यक्तीने सापावरच आपला राग काढला.
व्हिडीओमध्ये दुचाकीस्वार दारू पिऊन सापावर ओरडताना पाहायला मिळतोय. 'तुझी हिंमत कशी झाली माझा रस्ता अडवण्याची?, यानंतर मद्यपी चिडला आणि त्याने रागाच्या भरात दाताने सापाचे तुकडे तुकडे केले. विशेष म्हणजे साप विषारी नव्हता. 4 मे रोजी पहिल्या दिवशी सुमारे 45 कोटींची दारू विकली गेली.
एका दुकानात एका व्यक्तीला 52 हजार रुपयांची दारू विकली गेली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवानगीचे हे उल्लंघन आहे. उत्पादन शुल्क विभागाने विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, कारण त्याने 13 लिटरपेक्षा जास्त मद्य आणि 35 लिटर बीअर खरेदी केली आहे, तर राज्यातला एक ग्राहक दररोज 2.6 लिटर विदेशी मद्य आणि 18 लिटर बीअर खरेदी करू शकतो, असा नियम लावण्यात आला आहे.