कसे हटवणार अतिक्रमण?...जोड आहे..
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून पथकाची कारवाई ठप्प आहे. अशा परिस्थितीत अतिक्र्रमण कसे हटविणार, असा गंभीर ...
कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून पथकाची कारवाई ठप्प आहे. अशा परिस्थितीत अतिक्र्रमण कसे हटविणार, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. यावर गुंड प्रवृत्तीच्या काही टोळ्यांनी संगनमताने कब्जा केलेला आहे. दुसरीकडे अतिक्रमण कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने पथकावर हल्ले होतात. त्यामुळे शहरातील नासुप्रच्या चार विभागांनी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा. अशी शिफारस मुख्यालयाकडे केली आहे. परंतु मागणीनुसार पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने चित्र आहे.यावर तोडगा काढण्यासाठी बैठका सुरू आहेत. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. अतिक्रमण करणाऱ्यांचे समर्थक पथकावर हल्ले करतात. याला आळा घालण्यासाठी विभागीय कार्यालयांनी मुख्यालयाकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याचा प्र्रस्ताव पाठविला आहे. दुसरीकडे गरज भासल्यास पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जातो. असा दावा प्रशासनाने केला आहे. नासुप्र पथकाला कारवाई करण्यासाठी गृहमंत्रालयाने १२ पोलीस कर्मचारी उपलब्ध केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन नासुप्रकडून दिले जाते. परंतु काही दिवसापूर्वी सहा पोलिसांना मुख्यालयात तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे सहा पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटविणे शक्य होत नाही. पोलिसांची संख्या कमी असल्याने पथकावर हल्ले करण्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. त्यामुळे पथकातील अधिकारी व कर्मचारी दहशतीत आहेत. चौकट..मागील काही दिवसातील हल्ल्याच्या घटना१ : मार्च महिन्यात पाटणकर चौकात अतिक्रमण काढताना अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न.२ : जून महिन्यात शांतिनगर भागात दुकानाचे अतिक्रमण काढताना पथकाला घेराव.३ : जून महिन्यात अवस्थीनगर भागातील जाफरनगर येथे पथकावर दगडफेक ४ : मानकापूर भागातील झिंगाबाई टाकळी येथील प्रवेशव्दाराजवळ जीम संचालकाच्या समर्थकांसोबत झडप५ : जरीपटका भागातील नारा घाट येथील जमिनीवरील अतिक्रमण कारवाई पोलीस संरक्षण नसल्याने स्थगित