मुंबई - नागपूरपासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की किया सेल्टोस या चार चाकी गाडीचे अक्षरश: दोन तुकडे झाले. मात्र, गाडीचे दोन तुकडे होण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळेच, या गाडीचे दोन तुकडे झालेच कसे, हे कोडे कुणालाही उलगडेना गेलंय. नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.
कारचालकाचा दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटला आणि कार छोट्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली. यात कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले असून, कारमधील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक व एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध 304 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
आम्ही घटनास्थळाला भेट दिली असून मॉकड्रीलही करण्यात आले आहे. समोरुन येणाच्या दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचा ताबा सुटला. त्यातच, गाडीचा वेग अधिक असल्याने गाडी दुभाजकावर आदळल्याने गाडीचे दोन तुकडे झाले असावेत, प्रथमदर्शनी हेच दिसून येत असल्याचे छिंदवाडेच प्रदेश परिवहन अधिकारी सुनील कुमार शुक्ला यांनी म्हटले आहे.
अपघातातील मृतांमधील एक महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी आहे. हा भीषण अपघात नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौसंर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये प्रिया सचिन जयस्वाल (३२, रा. कळमेश्वर), रोशनी अनूप जयस्वाल (३०) व माधुरी अंगद जयस्वाल (३६) दाेघीही रा. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघींचा समावेश असून, संचित प्रेम जयस्वाल व नीलम संचित जयस्वाल (३२) दोघेही रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. जयस्वाल यांच्या नातेवाईकाने रामाकोना (मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी रात्री लग्न असल्याने हे सर्व जण लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते.