नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कशा प्रकारे चुना लावते, याची माहिती समोर आली आहे. देशभरात एसबीआयचे 43 हजारांहून अधिक एटीएम आहेत. तसेच आजकाल जास्त करून लोक पैसे काढण्यासाठी थेट बँकेत न जाता एटीएमचा वापर करतात. ब-याचदा मिनी स्टेटमेंटही एटीएम मशिनमधून घेतलं जातं. डेबिट कार्डांवरील व्यवहारांसाठी छोट्या व्यावसायिकांना आकारण्यात येणा-या शुल्कावर रिझर्व्ह बँकेने मर्यादा घातल्या होत्या. या शुल्काची वाटणी कशी करायची यावरून बँका आणि पेमेंट कंपन्या यांच्यात वाद सुरू आहे. या शुल्कास मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) असे म्हटले जाते. व्यावसायिकांकडून ते वसूल केले जाते. व्हिसा, मास्टरकार्ड आणि रु-पे यासारखी कार्डे देणा-या बँका आणि व्यावसायिकांना स्वाइप मशिनसारखे ‘पॉइंट ऑफ सेल टर्मिनल’ उभे करून देणा-या पेमेंट कंपन्या यांच्यामार्फत हे व्यवहार होतात. परंतु एसबीआय ग्राहकांकडून एटीएमच्या माध्यमातून अनेक चार्जेस वसूल करतं.एसबीआयकडून कसा लावला जातो ग्राहकांना चुना ?- एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड डेबिट कार्डसाठी 100 रुपये वसूल केले जातात. त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी सेवाकराबरोबर 306 रुपये शुल्क आकारले जाते. - जिथे क्लासिक डेबिट कार्डवर 100 रुपये सेवाकर वसूल केला जातो. दुसरीकडे सिल्व्हर, गोल्ड डेबिट कार्डासाठी 150 रुपये अधिक सेवाकर वसूल केला जातो. प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 200 रुपये आणि सेवाकर लागतो. प्राइड, प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी 300 रुपये अधिक सेवाकर वसूल केला जातो. - डेबिट कार्डसाठी 204 रुपयांसह अधिक पैसे वसूल केले जातात. बँक 51 रुपये सेवाकर वसूल करते. - एटीएमच्या माध्यमातून महिन्याचे 5 ट्रान्झॅक्शन मोफत आहेत. परंतु त्यानंतरच्या व्यवहारावर 17 रुपये सेवाकर वसूल केला जातो. तसेच गैर वित्तीय व्यवहारावर 6 रुपये अधिकचं शुल्कही आकारलं जातं - एटीएमच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार केल्यास सेवाकरासहीत 169 रुपयांएवढं शुल्कही वसूल केलं जाते. - तुमच्या बँकेत पर्याप्त रक्कम नसेल आणि तुम्ही एटीएमच्या माध्यमातून व्यवहार केल्यास तुम्हाला 17 रुपये सेवाकरासह मोजावे लागतात.
तुम्ही SBI बँकेचे ग्राहक आहात?, मग तुमचे डेबिट कार्ड बंद होणारदेशातील मोठी अन् महत्वाची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. एसबीआयकडून कनवर्जन प्रोसेस करण्यात येत असून यासाठी ग्राहकाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. तसेच ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक डेबिट कार्ड आहे, त्या ग्राहकांना ईएमव्ही चीप डेबिट कार्डद्वारे 31 डिसेंबर पर्यंत आपले डेबिट कार्ड बदलावे लागणार आहे. जर, ग्राहकाने 31 डिसेंबरपर्यंत तुमचे डेबिट कार्ड न बदलल्यास, त्यानंतर जुन्या डेबिट कार्डने एकही व्यवहार करता येणार नसल्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. कोणाला ट्रीट देत असाल, तर जर जपून; क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्लोनिंग करणारी टोळी गजाआड