शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

भारतातील श्रीमंत कसा खर्च करतात पैसा ? सर्व्हेतून मिळाली इंटरेस्टिंग उत्तरं

By sagar sirsat | Updated: February 15, 2018 14:13 IST

श्रीमंत लोकं कसे राहतात ?  काय खातात ? काय घालतात ? कुठे ठेवतात एवढे सगळे पैसे ? असे अनेक प्रश्न आहेत ज्या विषयी सामान्य व्यक्तींच्या मनात कुतुहल आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं...

नवी दिल्ली :  श्रीमंत लोकं कसे राहतात ?  काय खातात ? काय घालतात ? कुठे ठेवतात एवढे सगळे पैसे ? असे अनेक प्रश्न आहेत ज्या विषयी सामान्य व्यक्तींच्या मनात कुतुहल आहे. भारतातील गर्भश्रीमंत लोकं पैसे कसे खर्च करतात हे जाणून घेण्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. ते खूप सोनं खरेदी करतात का, की घर-जमीन खरेदी करतात की आपल्या पैशांची गुंतवणूक करतात ? तुमच्या मनातल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं कोटक वेल्थ मॅनेजमेंटच्या ‘टॉप ऑफ द पिरामिड’ या अहवालामध्ये आहेत.या अहवालात देशातील गर्भश्रीमंत लोकांनी गेल्या वर्षात केलेल्या खर्चाचा अभ्यास करण्यात आला आहे. देशातील 60 टक्के श्रीमंतांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे, गेल्या वर्षी हा आकडा 47 टक्के होता. श्रीमंतामध्ये जसजशी युवकांची संख्या वाढत आहे त्यांची लाइफस्टाइलही बदलतेय असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. कोणत्या गोष्टींवर अमिर लोकांचा खर्च वाढला आणि कोणत्या गोष्टीवर खर्च त्यांनी कमी केला हे देखील अहवालात सांगण्यात आलं आहे. 2022 पर्यंत श्रीमंतांची संख्या होणार दुप्पट - देशातील गर्भश्रीमंतांची संख्या 2017मध्ये 10 टक्क्यांनी वाढली आणि 1 लाख 60 हजार 600 इतकी झाली. 2022 पर्यंत ही संख्या दुपटीने वाढून 3 लाख 30 हजार 400 होईल असा दावा अहवालात करण्यात आला आहे, तसंच त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती 3.52 लाख अब्ज रूपयांच्या घरात जाईल असं म्हटलं आहे. देशातील गर्भश्रीमंतांपैकी 56 टक्के लोकं 4 मेट्रो शहरांतून आहेत. तर 18 टक्के लोकं पुढील टॉप 6 शहरं म्हणजे बंगळुरू, अहमदाबाद, पुणे , हैदराबाद, नागपूर आणि लुधियानामध्ये राहतात.  कोटक वेल्थ मॅनेजमेंट ‘टॉप ऑफ द पिरामिड’ अहवाल -गर्भश्रीमंत लोकं आपल्या मासिक उत्पन्नाच्या 45 टक्के सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट करतात, तर 55 टक्के खर्च करतात.   सर्वात जास्त खर्च कपडे आणि अॅक्सेसरीजवर - 2017 मध्ये गर्भश्रीमंत लोकांच्या ज्या खर्चामध्ये सर्वाधिक 16 टक्के वाढ नोंदवण्यात आली ती म्हणजे कपडे आणि अॅक्सेसरीजवर. याचं कारण भारतातील तरूण श्रीमंतांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ असं कारण सांगण्यात आलं आहे. तरूणांचा फॅशनकडे जास्त कल असतो. श्रीमंतामध्ये जसजशी युवकांची संख्या वाढत आहे त्यांची लाइफस्टाइलही बदलतेय.सुट्ट्यांवरचा खर्च दोन नंबरवर -श्रीमंत लोकांनी दुसरा सर्वाधिक खर्च हा सुट्ट्यांवर करण्यास सुरूवात केली आहे. परदेशामध्ये जाऊन सुट्टया घालवण्याचा त्यांचा खर्च 13 टक्क्यांनी वाढला आहे.  ज्वेलरी घेण्याचा खर्च केला कमी -सोनं खरेदीवर केला जाणारा खर्च कमी होऊन 12 टक्के झाला आहे, गेल्या वर्षी हा खर्च 17 टक्के होता. सोन्याच्या वाढलेल्या किंमती हे देखील यामागे एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. हेल्‍थकडे जास्त लक्ष - श्रीमंतांनी आता हेल्‍थ आणि फिटनेसकडे जास्त लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. हेल्थ क्लब आणि काही निवडक जिमच्या मेंबरशिपला प्राधान्य देतात.  व्हर्चुअल बॉक्सिंग, 360 फिटनेस, वॉटर वर्कआउट्स यांसारख्या नव्या ट्रेंड्सऐवजी योगाकडे कल वाढला आहे. 'स्‍पा'ची आवड नाही -'स्पा' श्रीमंतांच्या आवडीचा एक भाग आहे असा अनेकांचा समज आहे. पण अहवालामध्ये केवळ एक तृतियांश श्रीमंतांनी (वय 25 ते 40)  दर महिन्याला स्पा घेण्यासाठी जातो असं म्हटलं आहे. 51 ते 60 वयोगटातील श्रीमंत कधीच स्पामध्ये गेलेल नाहीत. 41 ते 50 वयोगटातील श्रीमंत लोकं महिन्यातून दोनवेळेस स्पामध्ये जातात.  फिटनेस गॅझेटचं क्रेझ नाही - फिटनेस गॅझेटचं क्रेझ भारतीय श्रीमंतांमध्ये नाहीये असं अहवालात म्हटलंय. खूप कमी श्रीमंतांना फिटनेस गॅझेटची आवड आहे.  सामान्य व्यक्तीप्रमाणे इंटरनेटची आवड -इंटरनेटची आवड केवळ हेच भारतातील सामान्य व्यक्ती आणि श्रीमंतांमधील साम्य आहे. बहुतांश श्रीमंत दिवसातून किमान एकदा सोशल मीडियाचा वापर करतात. 52 टक्के श्रीमंत दिवसभरात किमान तीन वेळेस व्हॉट्सअॅप वापरतात, 86 टक्के श्रीमंत दिवसातून किमान एकदा फेसबुक वापरतात.  कमाई - 45% सेविंग्स आणि इनव्हेस्टमेंट 55%  खर्च52% अमिर लोकं दिवसभरात तीन वेळेस करतात व्हॉट्सअॅपचा वापर 86% अमिर लोकं दिवसभरात किमान एकदातरी फेसबूकवर जातात

                                                                                                                                                       - सागर सिरसाट