लखनौ - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, खासदार अमर सिंह यांनी न्यायालयीन कोठडीत बंद असलेल्या चिदंबरम यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करण्याच्या बहाण्याने त्यांना चिमटा काढला आहे. इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो, असा टोला अमर सिंह यांनी गुरुवारी ट्विटरवरून लगावला. गुरुवारी संध्या काळी केलेल्या ट्विटमध्ये अमर सिंह म्हणतात,''माझे जुने परिचित असलेल्या पी. चिदंबरम यांच्याबाबत पहिल्यांदाच सहानूभुती वाटत आहे. माझ्यावर मुत्रपिंड प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही काळातच त्यांचे सरकार वाचवले असतानाही त्यांनी माझी तुरुंगात रवानगी केली होती. मी त्याच तुरुंगातील फरशीवर उशीशिवाय झोपलो होतो. आज इतिहास पुन्हा एकदा स्वत:ची पुनरावृत्ती करत आहे. पी. चिदंबरम, आता तुम्हाला कसं वाटतंय?"'
आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:23 IST
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा
ठळक मुद्देआयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीतखासदार अमर सिंह यांनी न्यायालयीन कोठडीत बंद असलेल्या चिदंबरम यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करण्याच्या बहाण्याने त्यांना काढला चिमटा इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो, असा लगावला टोला