नवी दिल्ली - लाेकसभा असाे किंवा विधानसभा निवडणूक, मतदानाची वेळ संपली की लगेच एक्झिट पाेलचे आकडे प्रसिद्ध करण्यात येतात. काेणाचे सरकार येणार, याचा अंदाज त्यातून वर्तविण्यात येताे. मात्र, या एक्झिट पाेलबाबत लाेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, की हा काय प्रकार आहे, काेणाचे सरकार येणार, हा दावा कशाच्या आधारे केला जाताे, एक्झिट पाेल आणि ओपिनियन पाेल यांच्यात फरक काय इत्यादी. त्यांचीच उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
एक्झिट पाेल एक्झिट पाेल मतदानाच्या दिवशी ते केले जाते. मतदान केल्यानंतर सर्वेक्षण करणाऱ्या विविध संस्था मतदारांना काही प्रश्न विचारतात. त्यातून त्यांनी काेणाला मतदान केले, याचा अंदाज वर्तविण्यात येताे.
ओपिनियन पाेलहे सर्वेक्षण निवडणुकीच्या आधी केले जाते. सर्व घटकांतील लाेकांना त्यात सहभागी केले जाते. मतदारसंघातील प्रमुख मुद्द्यांवर प्रश्नावली तयार केली जाते. त्यातून जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेतला जाताे.
- भारतात १९६० मध्ये सर्वप्रथम दिल्लीतील ‘सेंटर फाॅर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग साेसायटीज’ने एक्झिट पाेलची सुरुवात केली हाेती. - १९९८मध्ये खासगी वृत्तवाहिन्यांनी प्रथमच एक्झिट पाेलचे प्रसारण केले हाेते.- १९३५ मध्ये अमेरिकेत जगातील पहिला एक्झिट पाेल प्रसिद्ध झाला हाेता. - त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्समध्ये एक्झिट पाेल प्रसिद्ध झाला हाेता.
सर्वेक्षण प्रसिद्ध कधी हाेतात?मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पाेल प्रसिद्ध करू शकत नाही. तसे केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड, अशा कठाेर शिक्षेची तरतूद आहे.
१९९८मध्ये लाेकसभेवेळी निवडणूक आयाेगाने सर्वप्रथम एक्झिट पाेल प्रसिद्ध करण्यावर निर्बंध घातले हाेते. त्याविराेधात प्रसारमाध्यमांनी न्यायालयांत धाव घेतली हाेती. मात्र, न्यायालयाने आयाेगाची बाजू उचलून धरली हाेती.