black fungus symptoms : कोरोना व्हायरसच्या संकटात ब्लॅक फंगसचे (black fungus) संकट वाढू लागले आहे. देशातील विविध भागांत म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) रुग्ण वाढू लागले आहेत. अनेकांचा मृत्यूदेखील होऊ लागला आहे. एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानमध्ये देखील प्रकोप वाढू लागला आहे. अशावेळी एम्सने ब्लॅक फंगसबाबत काही गाईडलाईन जारी केली आहेत. जी ब्लॅक फंगसची ओळख पटविणे (symptoms of mucormycosis in eyes in Marathi) आणि त्याच्या उपचारासाठी मदत करू शकतात. (AIIMS has now issued guidelines to detect black fungus and steps to be taken in such situations.)
कोणत्या रुग्णांना अधिक धोका.... (Who is in Danger of black fungus, Mucormycosis?)- ज्या रुग्णांना डायबेटिसचा आजार आहे. मधुमेह असुनही ते tocilizumab सारख्या स्टेरॉईड औषधाचे सवन करतात. - कॅन्सरचे उपचार सुरु असलेले किंवा जुन्या आजाराने त्रस्त. (symptoms of mucormycosis)- tocilizumab आणि स्टेरॉईडचे अधिक सेवन करतात. - कोरोनाने गंभीर रुग्ण जे ऑक्सिजन मास्क किंवा व्हेंटिलेटरवर आहेत.
ब्लॅक फंगस झाला हे कसे समजेल? (how to indetify Black fungus, Mucormycosis?)- नाकातून रक्त वाहणे, पापड्या जमणे किंवा काळ्या रंगाचे काही बाहेर येणे. (symptoms of black fungus)- नाक बंद होणे, डोके किंवा डोळे दुखी, डोळ्यांच्या पापण्यांवर सूज, धुरकट दिसणे, डोळे लाल होणे, कमी दिसणे, डोळे उघडझाप त्रास होणे- चेहऱा सुन्न होणे किंवा झिनझिन्या येणे. तोंड उघडल्यावर चावण्यासाठी त्रास होणे. - दातांचे पडणे, तोंडात किंवा आजुबाजुला सूज. (सारी लक्षणे चांगल्या प्रकाशात पहावित.)
भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO
ब्लॅक फंगसची लक्षणे दिसल्यावर काय काळजी घ्याल... (What next step after Mucormycosis, Black fungus detect)- कोणत्याही कान, नाक, डोळे म्हणजेच ENT डॉक्टरकडे जावे. किंवा अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे जावे. - उपचार रोजच्यारोज घ्यावेत. जर डायबिटीस असेल तर ब्लड शुगर मॉनिटर करत रहा. - अन्य कोणताही आजार असल्यास त्याचे औषध घेत रहा आणि लक्ष ठेवा. - स्वत:हून कोणत्याही स्टेरॉईड आणि अन्य कोणत्याही औषधाचे सेवन करू नये. डॉक्टरच्या सल्ल्यानेच उपचार करावेत. - डॉक्टरच्या सल्ल्यानुसार MRI आणि सीटी स्कॅन करावेत. नाक आणि डोळ्याची तपासणी गरजेची.