भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने 14 एप्रिल किंवा त्यापूर्वी आरक्षित केलेली नियमित ट्रेनच्या रद्द केलेल्या तिकिटांचा संपूर्ण पैसा प्रवाशांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 14 एप्रिल 2020 किंवा त्या आधी 120 दिवस ट्रेनचे तिकिट बुक केले असेल आणि त्याची ट्रेन रद्द झाली असेल तर तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत. रेल्वेच्या निर्णयामुळे भविष्यात रेल्वेसेवा कधीपर्यंत बंद राहिल याचेही संकेत देण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला एक पत्र पाठविले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून या पत्रानुसार संकेत मिळत आहेत की, 15 ऑगस्टच्या आधी ट्रेन सुरु होणार नाहीत. कोरोनामुळे जवळपास तीन महिन्यांपासून सामान्य ट्रेनची वाहतूक बंद आहे. सध्यातरी देशातील कोरोनाची स्थिती सामान्य होण्याची शक्यता नाही. अडकलेल्या मजुरांना रेल्वेने विशेष ट्रेन चालवत त्यांच्या गावी पोहोचविलेले आहे. यामुळे देशात ट्रेन कधी सुरु होतील याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशात ट्रेन सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
आयआरसीटीसीने प्रवाशांना त्यांचे तिकिट रद्द न करण्याचे आवाहन केले आहे. आयआरसीटीसीनुसार रेल्वे जेव्हा ट्रेनच रद्द करेल तेव्हा आपोआपच तिकिटे रद्द होतील आणि त्याचा रिफंड प्रवाशांना दिला जाईल. ऑनलाईन तिकिट बुक केलेल्यांसाठी ही सूचना देण्यात आली आहे.
230 ट्रेन सुरुच राहणारकोरोना व्हायरसमुळे रेल्वेने 15 एप्रिलपासून नियमित ट्रेनचे बुकिंग बंद केले होते. यामुळे पुढे बुकिग करता आले नाही. यानंतर केंद्राच्या सुचनेनुसार मे महिन्यापासून अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वेने 230 विशेष रेल्वे सुरु केल्या होत्या. त्या पुढेही सुरुच राहणार आहेत.
रेल्वेच्या कमाईत ५८ टक्के घटकाटकसरीच्या उपायातहत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा नवीन भरती न करण्याचा, तसेच माध्यमातून कंत्राटाने करता येणारी कामे सीएसआरच्या (कंपनी सामाजिक जबाबदारी) माध्यमातून करण्याचा आणि मनुष्यबळ तर्कसंगत करण्याचा इरादा आहे. रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशांत वित्तीय आयुक्तांना १९ जून रोजी रेल्वे विभागाच्या सर्व सरव्यवस्थापकांना मेअखेर मागील वर्षाच्या तुलनेत रेल्वेच्या कमाईत ५८ टक्के घट झाली आहे. त्यामुळे नियंत्रित खर्च करून उत्पन्न वाढविण्याचे नवे मार्ग शोधावे लागतील, असे कळविले आहे. सोबत त्यांनी रेल्वेच्या सर्व विभागांना कंत्राटाचा फेरविचार करण्याचे आणि विजेचा वापर कमी करण्यास सांगितले आहे, तसेच सुरक्षेशी संबंधित पदे वगळता नवीन पद निर्मिती केली जाणार नाही, तसेच सर्व संचिकांचे काम डिजिटल पद्धतीने करण्याचा आणि सर्व पत्रव्यवहार सुरक्षित ई-मेलच्या माध्यमातून करण्याचा सल्लाही दिला आहे.या आधी मोदी सरकारने २०२०-२१ दरम्यान सर्व अधिकाऱ्यांचे परदेशातील नियोजित प्रशिक्षण स्थगित केले होते, तसेच अपवादात्मक स्थितील आवश्यक परदेशी प्रशिक्षणाला मुभा दिली जाईल; परंतु यासाठी कार्मिक अािण प्रशिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे १५ जून रोजीच्या आदेशात म्हटले आहे.
अन्य महत्वाच्य़ा बातम्या...
"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'
'हे तर टोपी नसलेले तबलिगी'; जगन्नाथ रथयात्रेवरून मोदींच्या खास मित्राचे वादग्रस्त विधान
"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त
4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला
India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार
न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम