शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गोंधळच गोंधळ...! पाकिस्तानी हसीना सीमा हैदरचे किती 'प्रियकर'? आता समोर आला आणखी एक 'lover'!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 6:09 PM

Seema Haider Love Affairs : पाकिस्तानी महिला सीमा हैदरसोबत PUBG खेळणारा आणखी एक तरुण आला समोर... केले मोठे दावे...!

PUBG खेळता पार्टनरच्या प्रेमात पडलेल्या आणि नंतर चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरसंदर्भात रोजच्या रोज नव-नवीन गोष्टी समोर येत आहेत. आपण सचिन मीनासोबत लग्न केले असून तो आपला पती असल्याचे सीमा हैदर सांगत आहे. मात्र असे असले तरी, तो तिचा एकटाच प्रियकर नाही. कारण, स्वतःला सीमा हैदरचा एक्स प्रियकर म्हणवणाऱ्या पाकिस्तानातील एका तरुणाने सीमा संदर्भात धक्कादायक दावे केले आहेत. या तरुणाने, सीमाचा भारतात येण्यामागील खरा उद्देश आणि पाकिस्तानला परतण्याची वेळही सांगितली आहे.

पाकिस्तानी तरुणाचा दावा -पाकिस्तानी महिला सीमा हैदरसोबत PUBG खेळणारा आणखी एक तरुण समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणाने दावा केला आहे की, तो सीमाच्या दोन वर्षांपासून संपर्कात होता. पाकिस्तानातील एका यूट्यूब चॅनलने या तरुणाची मुलाखत दाखविली आहे. यात त्याने, सीमासोबत आपली मैत्री होती, आपण सीमाला भेटलोही आहोत. तसेच, आम्ही लग्न करण्याचेही ठरवले होते, असे म्हटले आहे.

या पाकिस्तानी तरुणाने दावा केला आहे की, सीमा क्रिकेटची चाहती आहे. तिचा भारतात पोहचण्याचा हेतू केवळ वर्ल्डकप 2023 पाहणे आहे. वर्ल्डकप पाहिल्यानंतर, सीमा पुन्हा तिचा पती गुलाम हैदर कडे जाईल.

व्हिसा न मिळाल्याने सीमा अशी आली भारतात -खरे तर, सीमा विवाहित आहे. तिचा नवरा दुबईत काम करतो. त्याच्यापासून तिला 4 मुले आहेत. पण, सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी व्हिसा न मिळाल्याने, ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली.

या अटीवर मिळाला जामीन - मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह झाला आहे. न्यायालयाने पत्ता न बदलण्याच्या आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर या दोघांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी सचिनच्या वडिलांनाही जामीन मिळाला आहे. जेवर दिवाणी न्यायालयाच्या ज्यूनिअर डिव्हिजनचे न्यायाधीश नाजीम अकबर यांनी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, त्यांना जामीन मंजूर केला. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारतmarriageलग्न