नवी दिल्ली : देशात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झालेला असताना बेरोजगारीचा दर वाढल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील युवक १७ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करतील. गुरुवारी गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, प्रचंड प्रमाणातील बेरोजगारीमुळे युवकांना आज ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ असे म्हणण्यास भाग पडले आहे.रोजगार असणे ही प्रतिष्ठा आहे आणि सरकार ती किती दिवस नाकारणार आहे? १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो. दुसऱ्या ट्विटमध्ये गांधी यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपने मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त १४ ते २० ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यास सुरुवात केली.जीडीपी घसरलाराष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार भारताचा एप्रिल-जून या तिमाहीचे सकल देशी उत्पादन (जीडीपी) २३.९ टक्क्यांवर घसरले. 40 वर्षांत प्रथमच अशी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जाणार असल्यामुळे बेरोजागारीचा दर वाढतच जाणार आहे.
सरकार रोजगार किती दिवस नाकारणार? राहुल गांधींचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:05 AM