जगातील 108 देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन पसरला आहे. एवढेच नाही कर आतापर्यंत थोडे थोडके नव्हे दीड लाखांवर रुग्ण समोर आले आहेत. तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडून महिना झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, जगभरात 108 देशांमध्ये 1.51 लाखांहून अधिक ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. तर 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेन, अमेरिका, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा, जर्मनी, साऊथ आफ्रिकामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन किती खतरनाक आहे, याची डब्ल्यूएचओने तीन कारणे सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे जागतिक स्तरावर रुग्णांची संख्या खूप आहे. दुसरे असे की इम्यून एस्केपची संभाव्यता देखील जास्त आहे. याशिवाय ओमायक्रॉन जास्त संक्रामक देखील आहे, असे भूषण म्हणाले.
भारतात कोरोनाचे दररोज 7000 रुग्णमंत्रालयाने सांगितले की, अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत दर आठवड्याला कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. तथापि, आशियामध्ये ही प्रकरणे कमी होत आहेत. भारतात गेल्या 24 आठवड्यांतील सरासरी रोजची प्रकरणे 7 हजार आहेत. गेल्या चार आठवड्यांपासून भारतात दररोज १० हजारांहून कमी केसेस येत आहेत.
जग चौथ्या लाटेचा सामना करत आहेआरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात दोन लाटा आल्या आहेत. पहिली सप्टेंबर 2020 मध्ये आणि दुसरी मे 2021 मध्ये. जगात चौथी लाट येत आहे. त्यामुळे आपण सावध राहण्याची गरज आहे.