Assam Govt to ban ban polygamy: आसाममध्ये बहुविवाह पद्धती संपवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आसामच्या राज्यपालांनी एक 5 सदस्यीय कमेट बनवली जी बहुविवाह पद्धतीवर बंदी घालण्यासाठी योग्य कायदा आणि मसुदा तयार करतील. म्हणजे आसाममध्ये लग्नाच्या या पद्धतीवर बंदी घालण्यासाठी मोठी पावलं उचलली जात आहेत.
बहुविवाह पद्धतीवर बंदी का?
मुख्यमंत्री हिमंता यांनी अनेक ठिकाणी सांगितलं आह की, बराक घाटातील तिन्ही जिल्ह्यात आणि होजई व जमुनासुख भागात बहुविवाह पद्धती प्रचलित आहे. शिक्षित वर्गात याचा दर कमी आहे. तसेच स्थानिक मुस्लिम समाजातही याचं प्रमाण कमी आहे. याबाबत आणखी खोलवर माहिती घेतल्यावर समजलं की, आसाममध्ये बालविवाहाविरोधात ऑपरेशनमध्ये खुलासा झाला होता की, बऱ्याच वयोवृद्ध लोकांनी अनेक लग्ने केली होती आणि त्यांच्या पत्नी जास्तकरून तरूण होत्या. ज्या गरिब घरातील होत्या.
मुंबईतील इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS)चा एप्रिल महिन्यात एक रिपोर्ट समोर आला होता. हा रिसर्च नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या आकडेवारीवर आधारित होता. या रिसर्चनुसार, बंदी असूनही भारतात आजही बहुविवाह प्रथा प्रचलित आहे. असं नाही की, ही प्रथा केवळ मुस्लिमांमध्येच आहे. हिंदू आणि इतर धर्मांमध्येही वहुविवाह प्रथा आहे.
आकडेवारीनुसार, इतर राज्यांच्या तुलनेत पूर्वोत्तर भारतात बहुविवाह कॉमन आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, मेघालय, मिझोराम, नगालॅंड, सिक्किम आणि त्रिपुरामध्ये बहुविवाह अधिक होतात. याचं प्रमाण मणिपूरमध्ये अधिक आहे.
NFHS-5 च्या सर्वेनुसार, मणिपूरच्या 6 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी सांगितलं की, त्यांच्या पतीने एकापेक्षा जास्त लग्ने केली आहेत. मिझोराममध्ये हे प्रमाण 4.1 टक्के, सिक्कीममध्य 3.9 टक्के, अरूणाचल प्रदेशात 3.7 टक्के आणि आसामध्ये 2.4 टक्के आहे.
6 दशकांआधी म्हणजे 1961 मध्ये झालेल्या जनगणनेत बहुविवाहाबाबत आकडेवारी जारी करण्यात आली होती. त्यानुसार, तेव्हा देशात मुस्लिमांमध्ये बहुविवाहाची टक्केवारी 5.7 टक्के होती. ही टक्केवारी इतर समाजांच्या तुलनेत कमीच होती. हिंदूंमध्ये हा दर 5.8 टक्के, बौद्धांमध्ये 7.9 टक्के, जैनांमध्ये 6.7 टक्के आणि आदिवासींमध्ये 15.25 टक्के होता.
देशात याबाबत काय आहे कायदा?
भारतात बहुविवाह पद्धतीवर बंदी आहे. मुस्लिम सोडून इतर कोणत्याही धर्मातील लोकांनी दुसरं लग्न करण्यास मनाई आहे. 1955 च्या हिंदू मॅरेज अॅक्टनुसार, पती किंवा पत्नी जिवंत असताना घटस्फोटाशिवाय दुसरं लग्न करणं गुन्हा आहे. असं कुणी केलं तर त्यांना शिक्षा होऊ शकते.