लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तरुणांनी राजकारणात यायला हवे, त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवायला हवे, असे नेहमीच म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात संसदीय राजकारणात तरुणांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
१७व्या लोकसभेत ४० पेक्षा कमी वयोगटातील खासदारांची संख्या ६ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. दुसरीकडे निम्म्याहून अधिक खासदारांची लोकसभेत पहिलीच वेळ होती, तर दोन खासदार सलग आठव्यांदा सभागृहात आले होते.
सर्वाधिक काळ खासदार कोण?
- सीपीआयचे ज्येष्ठ नेते इंद्रजित गुप्ता हे लोकसभेतील सर्वाधिक काळ सदस्य राहिले. ते १९७७ ते १९८० हा कालावधी वगळता १९६० पासून २००१ पर्यंत लोकसभेचे सदस्य होते.
- ते पश्चिम बंगालमधून तब्बल ११ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. नुकत्याच जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला होता.
वयोगटानुसार खासदार
३०-४० ३६ ४१-५० ९१ ५१-६० १४८ ६१-७० १५४ ७१ ९०
ठाकरेंचा प्रस्ताव हास्यास्पद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याचे दिलेले निमंत्रण हे हास्यास्पद आहे. शिवसेनेने भाजपच्या नेत्यांच्या उमेदवारीबाबत चिंता करण्याची गरज नाही. निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी भाजपमध्ये स्वतंत्र प्रणाली आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री
निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही
आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची मला इच्छा नाही. पक्षाचा प्रभावी प्रचार करण्यावर पक्षाच्या वतीने निवडणूक लढणाऱ्यांच्या प्रचारावर मी लक्ष केंद्रीत करणार आहे. काँग्रेसने मला व माझ्या परिवाराला अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्याबद्दल मी पक्षाप्रती कृतज्ञ आहे. - भरतसिंह सोळंकी, कॉंग्रेस नेते