शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अबब! भाजपाला पंजाबमध्ये १८ कोटी अन् यूपीत ८७ लाखांना मिळाली १ विधानसभा जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 09:39 IST

नियमांनुसार, राजकीय पक्षांना खर्चाचा लेखाजोखा मांडावा लागतो. पक्षाने किती पैसे खर्च केले? कॅश, चेक, ड्राफ्टनं किती पेमेंट दिले? याचा हिशोब ठेवून तो निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो.

नवी दिल्ली - भारतात निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार पैसा पाण्यासारखा खर्च करतात. उमेदवारांच्या खर्चासाठी निवडणूक आयोगानं मर्यादा आखून दिली आहे. परंतु पक्ष कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे खर्च करण्याचा पर्याय शोधतो. अलीकडेच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत कुणी किती पैसे खर्च केले? याचं स्पष्टीकरण राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाला दिले आहे. 

राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, केवळ २ मोठे राजकीय पक्ष भाजपा(BJP) आणि काँग्रेस(Congress) नं निवडणुकीसाठी ५०० कोटींहून अधिक खर्च केला आहे. भाजपानं ५ राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी ३४४.२७ कोटी खर्च केलत. काँग्रेसनं १९४.८० कोटी खर्च केलेत. २०१७ मध्ये याच राज्यात भाजपानं २१८ कोटी तर काँग्रेसनं १०८ कोटीहून अधिक खर्च केले. यावर्षी फेब्रुवारीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यात निवडणूक झाली. 

नियमांनुसार, राजकीय पक्षांना खर्चाचा लेखाजोखा मांडावा लागतो. पक्षाने किती पैसे खर्च केले? कॅश, चेक, ड्राफ्टनं किती पेमेंट दिले? याचा हिशोब ठेवून तो निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. जर विधानसभा निवडणुका असतील तर ७५ दिवस आणि लोकसभा निवडणुका असतील तर ९० दिवसांच्या आत खर्चाचा रिपोर्ट द्यावा लागतो. 

भाजपानं कुठे अन् किती केला खर्च? नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक खर्च करण्यात भाजपा आघाडीवर आहे. भाजपानं यंदाच्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ३४४ कोटीहून अधिक खर्च केला. पक्षाने २२१.३१ कोटी रुपये उत्तर प्रदेशात प्रचारासाठी खर्च केले. यूपीत भाजपानं २५५ जागांवर विजय मिळवला. त्या हिशोबाने भाजपाला एका जागेसाठी जवळपास ८७ लाख खर्च करावे लागले. २०१७ मध्ये भाजपानं १७५.१० कोटी खर्च केले होते. तेव्हा ३१२ जागांवर विजय झाला. म्हणजे प्रत्येक जागेसाठी ५६ लाखांचा खर्च झाला. 

पंजाबमध्ये भाजपानं यावेळी ३६.६९ कोटी खर्च केले. २०१७ मध्ये याठिकाणी ७.४३ कोटी खर्च केले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत ५ पट अधिक खर्च करूनही भाजपाला केवळ २ जागांवर यश मिळाले. म्हणजे एक जागा भाजपाला १८ कोटींना मिळाली. गोवा इथे भाजपानं १९.०६ कोटी खर्च केले. त्याठिकाणी २० जागांवर भाजपा विजयी झाली. गोव्यात भाजपाला एक जागा ९५.३३ लाखांना मिळाली. उत्तराखंडमध्ये भाजपाला १ जागेसाठी ९३ लाख खर्च आला. त्याठिकाणी भाजपानं ४७ जागांवर विजय मिळवला. 

काँग्रेसने किती पैसे खर्च केले?काँग्रेसचा खर्च भाजपापेक्षा निम्मा आहे. काँग्रेसने या वर्षी पाच राज्यांमध्ये १९४.८० कोटी रुपये खर्च केले. म्हणजेच काँग्रेसने पाचही राज्यात जितका खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च भाजपाने एकट्या उत्तर प्रदेशात केला. गेल्या वर्षी, काँग्रेसने पाच राज्यांच्या (पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी) निवडणुकीत सुमारे ८५ कोटी रुपये खर्च केले. मात्र, यंदा सुमारे १९५ कोटी रुपये खर्च करूनही काँग्रेसला एकाही राज्यात सरकार स्थापन करता आलेले नाही. पाच राज्यांतील ६८० जागांपैकी काँग्रेसला केवळ ५६ जागा जिंकता आल्या. त्यानुसार एका जागेसाठी त्यांना ३.४७ कोटी रुपये मोजावे लागले.

पक्षांना उत्पन्न कुठून मिळतं?निवडणूक खर्चाचा मुद्दा झाला, आता राजकीय पक्षांची कमाई पाहू. राजकीय पक्षांसाठी इलेक्टोरल बाँड्स हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. ते बँकांकडून उपलब्ध आहे. उदा. समजा, एखाद्या व्यक्तीने SBI कडून निवडणूक बाँड विकत घेतले आणि ते कोणत्यातरी पक्षाला दिले. हा बाँड १ हजार ते १ कोटी रुपयांपर्यंत असू शकतात. याशिवाय राजकीय पक्ष देणग्या आणि सदस्यत्वातूनही कमावतात. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अहवालानुसार, २०२०-२१ मध्ये भाजपने ७५२.३३ कोटी रुपये जमा केले आणि ६२०.३९ कोटी रुपये खर्च केले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग