सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: देशात १९५० नंतर आजपर्यंत तब्बल २५ मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त कार्यकाळ सुरुवातीचे दोन म्हणजेच सुकुमार सेन आणि के. व्ही. के. सुंदरम यांचा राहिला आहे. त्यांनी जवळपास आठ वर्षे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेले आहे. पदाचा कार्यकाळ साधारण सहा वर्षांचा असतो. यामध्ये सर्वात कमी कार्यकाळ २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०, असा व्ही. एस. रमादेवी यांचा राहिला आहे.
आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त