नवी दिल्ली : OnePlus आज स्वस्त, सामान्यांना परवडणाऱ्या स्मार्टफोनवरून पडदा हटविणार आहे. OnePlus Nord 5G थोड्याच वेळात लाँच होणार असून अॅमेझॉन इंडियाचा एक स्क्रीन शॉट व्हायरल होऊ लागला आहे. यानुसार OnePlus Nord 5G ची किंमत भारतात 19,999 रुपये असणार आहे. यानंतर कंपनीचे सीईओ कार्ल पे यांनी जाहीर केले की, हा फोटो फेक आहे.
Nord at 19,999 हा विषय ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. कंपनीने महिनाभरापूर्वी वनप्लसची किंमत 25000 च्या आत असणार असल्याचे संकेत दिले होते.
वनप्लस थोड्याच वेळात एआर इव्हेंट करणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता फोन भारत आणि युरोपासाठी लाँच होणार आहे. हा स्वस्त फाईव्ह जी फोन असणार आहे. रिलायन्सने भारतात ५जी सेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी मुंबई, दिल्लीमध्ये स्पेक्ट्रमची मागणीही करण्यात आली आहे. सध्या 5जी चे भारतात उपलब्ध असलेले फोन हे 45000 च्या वरचे आहेत.
टेक्नॉलॉजीमधील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इव्हान ब्लास यांनी OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत. तसेच या फोनचे काही टिझरही त्यांनी लीक केले आहेत. व्हर्च्युअल नॉर्डच्या प्रेझेंटेशनमध्ये हे लीक समोर आले आहेत. या स्मार्टफोनला में 6.44 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट राहणार आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेंन्सरचा ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाठीमागे चार कॅमेरा दिसत आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेन्सरचा मुख्य कॅमेरा असेल. जो ऑप्टिकल व इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनने युक्त असणार आहे. दुसरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड अँगल लेन्सचा फोन मिळणार आहे. जो 119 डिग्री कॅप्चर करणार आहे. तिसरी लेन्स 5 मेगापिक्सलची डेप्थ सेन्सर असून 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स असू शकते. 8/128 जीबी आणि 12/256 जीबी असे दोन व्हेरिअंट बाजारात येऊ शकतात. तसेच LPDDR4X ची रॅम असू शकते. 4,115mAh ची बॅटरी, Warp Charge 30T, Wi-Fi 2X2 MIMO, Bluetooth v5.1 आणि NFC असू शकते. मार्बल, ग्रे ऑनेक्स आणि ग्रे अॅश अशा तीन रंगामध्ये असणार आहे. थोड्याच वेळात यावरून पडदा हटणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर
Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार
करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...
4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप
कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार
लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती
...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान