केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन करण्यासंदर्भात संसदेत प्रस्ताव सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान वक्फ बोर्डाकडील संपत्ती जाणून देशातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. आधिकृत आकेडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील इतर अनेक देशांतील वक्फ बोर्डांपेक्षा किती तरी पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले.
रेल्वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्चनंतर वक्फ कडे सर्वाधिक संपत्ती - देशातील सध्याच्या वक्फ बोर्ड अॅक्टमधील वादग्रस्त तरतुदीनुसार, एखादी जमीन वक्फ बोर्डाकडे गेली तर ती पुन्हा फिरवली जाऊ शकत नाही. देशातील सध्याचे सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड या दोघांची एकूण संपत्ती जाणून कुणाचेही डोके गरगरू शकते. यात वेगाने वाढही होत आहे. एका आकडेवारीनुसार, देशात रेल्वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्चनंतर, सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडेच आहे.
45 देशांपेक्षा अधिक जमीन -माध्यमांतील वृत्तांनुसार देशात वक्फ बोर्डाकडे तब्बल 3804 चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे. ही जगातील 45 देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, समोआ 2803, मॉरीशस 2007, हॉन्गकॉन्ग 1114, बहरीन 787 आणि सिंगापूर 735 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहेत. वक्फ बोर्डाकडील जमी यापेक्षा खूप अधिक आहे.
2022 मध्ये राज्यसभेत देण्यात आली होती माहिती - वर्ष 2022 मध्ये तत्कालीन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी लेखी उत्तरात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेसंदर्बात माहिती दिली होती. यात त्यांनी सांगितले होते की, वक्फ बोर्डाकडे देशभरात एकूण 7 लाख 85 हजार 934 एवढ्या मालमत्ता आहेत. यांपैकी उत्तर प्रदेशात वक्फकडे सर्वाधिक 2 लाख 14 हजार 707 मालमत्ता आहेत. यातील, 1 लाख 99 हजार 701 सुन्नी, तर 15006 शिया वक्फकडे आहेत. यानंतर, वक्फकडे बंगालमध्ये 80 हजार 480 मालमत्ता आहेत आणि तामिळनाडूमध्ये 60 हजार 223 मालमत्ता आहेत.