मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची सध्या देशभरात चर्चा आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी कोट्यवधी लोकांना भक्त बनवणाऱ्या बागेश्वर बाबांकडे मोठमोठे व्हीआयपी आणि नेते-मंत्री येत असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा हा नेहमीच होत असतो. बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या मालमत्तेबद्दल अनेकदा विचारण्यात आले आहे.
धीरेंद्र शास्त्री यांची कमाई किती आहे? याला उत्तर देताना बागेश्वर धामचे प्रमुख म्हणाले, "आमच्याकडे कोणतेही निश्चित उत्पन्न नाही, कारण आमची कोणतीही कंपनी किंवा व्यवसाय नाही. आमच्याकडे कोट्यवधींचे सनातनींचे प्रेम आहे, लाखो, करोडो लोकांचे आशीर्वाद आहेत आणि असंख्य संतांचे आशीर्वाद आहेत, एवढेच आपण कमावतो." किती पैसे मिळाले याचा हिशेब कोणीतरी ठेवत असेल. यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले. जितके सनातनी तितकी कमाई, तुम्ही हिशोब करा.
बागेश्वर बाबा म्हणाले, "आम्ही भक्तांकडून दक्षिणा घेतो, ती घेणे वाईट नाही. आपण तिचा योग्य वापर करतो. कोणी काही दिले तर आपण गुरू म्हणून स्वीकारतो. आपण त्या परंपरेचे आहोत जिथे गुरूला अंगठाही दान केला जातो. अशा परिस्थितीत जर कोणी स्वत:ला माझा शिष्य, मी त्यांचा गुरू मानत असेल, तर गुरुशिष्य परंपरा म्हणून त्याने आपल्याला काहीही द्यावे." रिपोर्टनुसार, बाबांची मासिक कमाई सुमारे 3.5 लाख रुपये आहे, मात्र याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. बाबांचे स्वतःचे जुने घर आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"