ई-कॉमर्स कंपन्यांच्या ‘बाय नाऊ, पे लेटर’ (बीएनपीएल) योजनांचा व्याप देशात वाढत चालला आहे. यात आता खरेदी करून पैसे नंतर अदा करण्याची सुविधा असते. पैसे देण्यासाठी १५ ते ४५ दिवसांचा अवधी असतो. पेमेंटच्या तारखेला खरेदीची रक्कम तुमच्या बँक खात्यात डेबिट होते. एकरकमी भरणा करायचा नसेल, तर देय रक्कम समान हप्त्यात रूपांतरित करून घेण्याचा पर्यायही यात असतो. ही सुविधा उपलब्ध करून देणारी कंपनी विक्रेत्यास पेमेंट करून टाकते. साधारणत: तीन किंवा त्यापेक्षा अधिक हप्त्यात पेमेंट करण्याची सुविधा खरेदीदारास मिळते.
३००००पर्यंत खरेदीची सोय ठरावीक अवधीत परतफेड केल्यास बीएनपीएलवर व्याज लागत नाही. मुदतीच्या आत पैसे भरले न गेल्यास मात्र व्याज आकारले जाते. व्याज मुक्त परतफेडीचा अवधी साधारणत: १५ ते ४५ दिवसांचा असतो. कर्ज मर्यादा ५०० रुपये ते ३० हजार रुपये इतकी असते.
बीएनपीएलचे फायदेबीएनपीएलमध्ये तात्काळ कर्ज उपलब्ध होते. यातील देवघेव अत्यंत सुरक्षित असते. ईएमआयमध्ये व्याज नसते. परतफेड अवधी निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. गॅजेट्स, फूड डिलिव्हरी, प्रवासाचे तिकीट बुकिंग, किराणा सामान व अन्य खर्चासाठी बीएनपीएलचा वापर केला जाऊ शकतो.
वैयक्तिक कर्जवैयक्तिक कर्जात मूळ रकमेवर व्याज लागते. बीएनपीएलमध्ये कोणतेही व्याज लागत नाही. वैयक्तिक कर्ज सुरक्षित आणि असुरक्षित असे दोन्ही प्रकारच्या कर्ज श्रेणीत उपलब्ध असते. बीएनपीएल मात्र केवळ सुरक्षित कर्ज श्रेणीतच उपलब्ध असते. बीएनपीएलमध्ये पैशाचा वापर मर्यादित आहे. वैयक्तिक कर्जात पैसे कसे खर्च करायचे यावर काेणतेही बंधन नसते.
क्रेडिट कार्ड आणि बीएनपीएल यांवरील खरेदी जवळपास सारखीच असते. मात्र, दोन्हींत थोडासा फरकही आहे. क्रेडिट कार्डचा वापर पेमेंट मोड स्वीकार करणाऱ्या व्यावसायिकांसोबत केला जाऊ शकतो. बीएनपीएलचा वापर मात्र केवळ एका भागीदार व्यावसायिकासोबतच केला जाऊ शकतो.
क्रेडिट कार्डावर काही छुपे शुल्क लागतात. बीएनपीएल मात्र पारदर्शक आणि कमी खर्चाचे मॉडेल आहे. क्रेडिट कार्डासाठी क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न मर्यादा यांसारखे कडक पात्रता नियम असतात. बीएनपीएल सुविधा सहज उपलब्ध होते.