ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते मिळालेली महागडी कार बीएमडब्ल्यू जिमनॅस्ट दीपा कर्माकर परत करणार असल्याची चर्चा बुधवारपासून सुरू आहे. 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणा-या सचिनच्या हस्ते मिळालेली बीएमडब्ल्यू दीपा खरंच परत करणार आहे की नाही, याचा खुलासा स्वतः दीपाने केला आहे. 'सचिनच्या हस्ते एखादी भेट मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती परत करण्याचा विचारही करू शकत नाही', असे दीपा कर्माकरने म्हटले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबाबत हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वर यांनी दीपाला महागडी कार बीएमडब्ल्यू भेट म्हणून दिली होती. ही कार सचिन तेंडुलकरच्या हस्ते तिला देण्यात आली होती.
आणखी बातमी
BMW ठरली पांढरा हत्ती, दीपा कर्माकर गाडी परत करणार?
दीपा त्रिपुरातील आगरतला या ठिकाणी रहाते. मात्र याठिकाणी 'एवढ्या महागड्या गाडीची देखभाल करण्यासाठी बीएमडब्ल्यूचे सर्विस सेंटर किंवा एखादे शो रुमदेखील नसल्याने मी केवळ तशी शक्यता बोलून दाखवली होती, गाडी नाकारण्याचे किंवा परत करण्याबाबत काहीही म्हटले नाही', असे दीपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे,'रहात असलेल्या ठिकाणी स्थानिक पातळीवरील एखाद्या वाहनासंदर्भात हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनसोबत बोलणी केल्यानंतर, त्यांनी त्यावर संमती दर्शवली आहे, अशी माहितीही दीपाने दिली आहे.
दीपा कर्माकरची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी
52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमधील जिमनॅस्टिक प्रकारात भाग घेणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय खेळाडू आहे. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये ती चौथ्या स्थानावर होती. ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचणारी दीपा कर्माकर पहिलीच भारतीय जिमनॅस्ट आहे.
Getting any gift from Sachin sir is a big thing. Can't even think of returning it: Gymnast Dipa Karmakar on BMW controversy. pic.twitter.com/bxZPzkhs3F— ANI (@ANI_news) October 13, 2016
I spoke with them (Badminton Association of Hyderabad) for any vehicle locally available and they gave their consent for that: Dipa Karmakar pic.twitter.com/fqNVkwEPlD— ANI (@ANI_news) October 13, 2016
No return or refusal, just that there is no showroom, service centre of BMW in Agartala, so I was talking about a possibility: Dipa Karmakar pic.twitter.com/JbhHKjjtvl— ANI (@ANI_news) October 13, 2016