- सुनील चावकेनवी दिल्ली - देशातील विद्यमान लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता ३८.३३ कोटी रुपये आहे. यातही ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता ५०.०३ कोटी तर गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी ३०.५० कोटी रुपये आहे. सर्वाधिक मालमत्ता तेलंगणा राज्यातील खासदारांकडे आहे. पक्षांचा विचार केला तर सर्वाधिक श्रीमंत खासदार भाजपचे असल्याचे अहवालातून समोर आले आहे.द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालकोणत्या पक्षातील खासदार सर्वांत श्रीमंत?तेलंगणातील खासदार सर्वांत श्रीमंत असून, २४ खासदारांची सरासरी मालमत्ता २६२.२६ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेश, पंजाब खासदार श्रीमंतीत पुढे आहेत. सर्वांत कमी मालमत्ता लक्षद्वीप खासदाराची ९.३८ लाख आहे.
१ हजार कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असलेले खासदार ३५०० कोटी ते १ हजार कोटी मालमत्ता असलेले खासदार ३१०० कोटी ते ५०० कोटी मालमत्ता असलेले खासदार ४७१० कोटी १०० कोटी मालमत्ता असलेले खासदार २१५१ कोटी ते १० कोटी मालमत्ता असलेले खासदार ४००१० लाख ते १ कोटी मालमत्ता असलेले खासदार ८२१० लाखांपेक्षा कमी मालमत्ता असलेले खासदार १३
पक्षनिहाय अब्जाधीश भाजप १४ | वायएसआरसीपी ७टीआरएस ७ | काँग्रेस ६ | आम आदमी पार्टी ३ । राजद २