‘जय श्री राम’ घोषणा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसे होते? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 06:10 IST2024-12-17T06:09:09+5:302024-12-17T06:10:26+5:30

मशिदीच्या आत जय श्री राम नारे लावल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्धची कारवाई रद्द केली होती.

how was chanting jai shri ram a criminal act the question from the supreme court | ‘जय श्री राम’ घोषणा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसे होते? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

‘जय श्री राम’ घोषणा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसे होते? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

नवी दिल्ली : ‘जय श्री राम’चा नारा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसे होते, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केला. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. 

याचिकेत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १३ सप्टेंबरच्या आदेशाला आव्हान दिले होते. यात मशिदीच्या आत जय श्री राम नारे लावल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्धची कारवाई रद्द केली होती. तक्रारदार हैदर अली सीएम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने विचारले की, ते विशिष्ट धार्मिक घोषणा देत होते किंवा नावे घेत होते. हा गुन्हा कसा आहे? मशिदीत येऊन घोषणाबाजी करणाऱ्यांची ओळख कशी झाली, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदाराला केली. याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारी २०२५ पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.


 

Web Title: how was chanting jai shri ram a criminal act the question from the supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.