शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 12:55 PM

Haryana Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

Haryana Election Results 2024: चंदीगड : भाजप हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. विधानसभेच्या ९० भाजपनं ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसनं ३७ जागा जिंकल्या. २०१४ नंतर हरयाणात भाजपनं स्वबळावर पहिल्यांदाच बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, २०२४ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. फक्त दोन मंत्र्यांचा विजय झाला आहे.

'या' आठ मंत्र्यांचा पराभव- ज्ञानचंद गुप्ता (विधानसभा अध्यक्ष)- पंचकुला- सुभाष सुधा- थाणेसर- संजय सिंह- नूंह- असीम गोयल- अंबाला शहर- कमल गुप्ता- हिसार- कंवर पाल- जगाधरी- जेपी दलाल- लोहारू- अभे सिंग यादव- नांगल चौधरी- रणजितसिंह चौटाला – रानियां (अपक्ष)

अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण...हरयाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असले तरी आठ मंत्र्यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामध्ये रानियां मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रणजितसिंह चौटाला यांचा समावेश आहे. ज्यांचे तिकीट भाजपनं रद्द केलं आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. या जागेवर INLD चे अर्जुन चौटाला विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत हिसारमधून रणजितसिंह चौटाला यांना भाजपनं तिकीट दिलं होतं, मात्र येथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांचाही पराभवविधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांचाही पंचकुला जागेवर काँग्रेसच्या चंदर मोहन यांनी पराभव केला. याशिवाय, ठाणेसरमध्ये भाजपच्या सुभाष सुधा यांचा काँग्रेसच्या अशोक अरोरा यांनी तीन हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. नूहंमध्ये भाजपचे संजय सिंह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे आफताब अहमद यांनी INLD उमेदवार ताहिर हुसेन यांचा ४६ हजारांहून अधिक मतांनी पराभव करून ही जागा जिंकली आहे. मुख्यमंत्री सैनी यांचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते असीम गोयल यांचाही अंबाला सिटी मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा काँग्रेसचे निर्मल सिंह मोहरा यांनी ११,१३१ मतांनी पराभव केला.

हिसार-लोहारू आणि नांगल चौधरीमध्येही भाजपचा पराभवहिस्सारमध्ये भाजपच्या डॉ.कमल गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर आल्यानं त्यांचा पराभव झाला. येथून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसच्या राम निवास राणा यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. याशिवाय, जगाधरी जागेवर भाजपचे उमेदवार कंवर पाल यांचा काँग्रेसच्या अक्रम खान यांच्याकडून पराभव झाला. लोहारू येथे जयप्रकाश दलाल यांचा काँग्रेसचे उमेदवार राजबीर फर्तिया यांनी अवघ्या ७९२ मतांनी पराभव केला. त्याचवेळी नांगल चौधरी मतदारसंघातून भाजपचे अभय सिंह यादव यांचा काँग्रेसच्या मंजू चौधरी यांनी पराभव केला आहे.

'हे' दोन मंत्री झाले विजयी विजयी मंत्र्यांमध्ये पानिपत ग्रामीण मतदारसंघातून राज्यमंत्री महिपाल धांडा आणि बल्लभगड मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री मूलचंद शर्मा यांचा समावेश आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा