नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचाहाऊडी मोदी हा कार्यक्रम रविवारी जल्लोषात पार पडला होता. या कार्यक्रमावर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी हाऊदी मोदी कार्यक्रम केवळ पब्लिसिटी असल्याची टीका करत पंडित जवाहरलाल नेहरुंचा फोटो शेअर केला होता. मात्र शशी थरुर यांनी चुकीचा फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हाऊडी मोदी या कार्यक्रमावर टीका करत शशी थरुर यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर केला होता. यामध्ये त्यांनी हा फोटो 1954मधील अमेरिकेचा फोटो आहे. या फोटोमध्ये गर्दी जमविण्यासाठी कोणत्याही प्रचाराची गरज लागली नव्हती. तसेच मीडियाचा वापर देखील न करता तेथील स्थानिकांनी उत्साहात स्वागत केले असल्याचे सांगत फोटो शेअर केला होता. मात्र शशी थरुर यांनी शेअर केलेले फोटो मुळात अमेरिकेतला नसून सोव्हिएत युनियनमधील असल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात कोली.
सोशल मीडियावर शशी थरुर यांनी केलेल्या चूका व्हायरल होऊ लागल्यावर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत म्हणाले की, मी शेअर केलेला फोटो अमेरिकेतला नसल्याचा खुलासा करत मला हा फोटो फॅारवर्ड करण्यात आल्याचे सांगितले. पणं काहीही असलं तरी देशाचे माजी पंतप्रधानींही परदेशात लोकप्रियतेचा अनुभव घेतल्यांचे त्यांनी सांगितले. तसेच जसा सन्मान मोदींना मिळत तसा सन्मान माजी पंतप्रधानांना देखील मिळाला आहे. पंतप्रधानांना मिळालेला सन्मान हा देशाबद्दलचा आदर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.