Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:08 AM2019-09-23T08:08:58+5:302019-09-23T08:10:41+5:30

हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसने नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

Howdy Modi: you that you are in the USA as our Prime Minister and not a star campaigner - Anand Sharma | Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप 

Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप 

Next
ठळक मुद्देहाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचे नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचा काँग्रेसचा आरोप नरेंद्र मोदीजी तुम्ही अमेरिकेत आमचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, निवडणुकीचे प्रचारक म्हणून नाही

नवी दिल्ली - अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी कार्यक्रम रविवारी रात्री ह्युस्टनमध्ये दणक्यात संपन्न झाला. या कार्यक्रमातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. दरम्यान, हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसनेनरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

हाऊडी मोदी कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्याची स्तुती केली होती. तसेच ''अबकी बार ट्रम्प सरकार'' असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. मोदींच्या याच विधानाला काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी मोदींचे हे वक्तव्य म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ''अन्य देशाच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन केले आहे. नरेंद्र मोदीजी तुम्ही अमेरिकेत आमचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, निवडणुकीचे प्रचारक म्हणून नाही.''असा टोला आनंद शर्मा यांनी मोदींना लगावला. 



अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांसमोर ट्रम्प यांची स्तुती केली होती. ''आज आमच्यासोबत एक खास पाहुणे आले आहेत. त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. कारण त्यांना पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस ओळखतो. त्यांचे नाव जागतिक राजकारणात प्रत्येकवेळी घेतले जाते. त्यांना करोडो लोक फॉलो करतात. भारताचे चांगले मित्र अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये असल्याचा अभिमान असल्याचे, मोदी म्हणाले होते. 

यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांची स्तुती केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा चाहता आहे. ते अमेरिकेला पुन्हा महान बनवायाला निघाले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करून दाखविले आहे. त्याच्याबद्दल आपलेपणा वाटत असल्याने मी कायम म्हणतो, ''अबकी बार ट्रम्प सरकार'' असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते.  

Web Title: Howdy Modi: you that you are in the USA as our Prime Minister and not a star campaigner - Anand Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.