नवी दिल्ली - अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी कार्यक्रम रविवारी रात्री ह्युस्टनमध्ये दणक्यात संपन्न झाला. या कार्यक्रमातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. दरम्यान, हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसनेनरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्याची स्तुती केली होती. तसेच ''अबकी बार ट्रम्प सरकार'' असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. मोदींच्या याच विधानाला काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी मोदींचे हे वक्तव्य म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ''अन्य देशाच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन केले आहे. नरेंद्र मोदीजी तुम्ही अमेरिकेत आमचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, निवडणुकीचे प्रचारक म्हणून नाही.''असा टोला आनंद शर्मा यांनी मोदींना लगावला.
Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 8:08 AM
हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसने नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
ठळक मुद्देहाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचे नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचा काँग्रेसचा आरोप नरेंद्र मोदीजी तुम्ही अमेरिकेत आमचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, निवडणुकीचे प्रचारक म्हणून नाही