लोकमत न्यूज नेटवर्कअहमदाबाद : आइस्क्रीम बाजारात दुसऱ्या स्थानी असणाऱ्या हॅवमोर आइस्क्रीम लिमिटेड उत्तर आणि दक्षिणेकडे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनी विस्तार करणार असून, तीन वर्षांत त्यासाठी २०० कोटी रुपये खर्चही करणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंकित छोना यांनी सांगितले. कंपनीने नुकतीच फरिदाबाद येथे प्रकल्प सुरू केला असून, त्यात दररोज २५ हजार लीटर आइस्क्रीमची निर्मिती केली जाते. या उत्पादन क्षमतेत वाढ करून १ लाख लीटर प्रतिदिन करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या कंपनीने १४ राज्यांमध्ये विस्तार केलेला आहे.
हॅवमोर आइस्क्रीम करणार १०० कोटींची गुंतवणूक
By admin | Published: May 13, 2017 12:13 AM