झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा
या घटनेबाबत माहिती देताना रेल्वे अधिकारी म्हणाले, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची माहिती चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान वेस्ट आउट आणि बारांबो दरम्यान चक्रधरपूरजवळ पहाटे ३.४५ वाजता मिळाली. एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "बाराबांबोजवळ मुंबई-हावडा मेलचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना बारांबो येथे वैद्यकीय मदत देण्यात आली. आता त्यांना चांगल्या उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात आले आहे. मदतकार्य अजूनही सुरूच आहे.
स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील खरसावन ब्लॉकमधील पोटोबेडा येथे हा रेल्वे अपघात झाला. या अपघातात मुंबई-हावडा मेल आणि मालगाडीचा समावेश आहे. जखमींची माहिती घेण्याच काम सुरू आहे.
'घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चक्रधरपूर रेल्वे विभागाचे अधिकारी, रिलीफ ट्रेन आणि अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेत ६ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. याशिवाय, बारांबोजवळ ट्रेन क्रमांक १२८१० रुळावरून घसरल्याच्या घटनेसाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक ०६५१-२७-८७११५ जारी केला आहे.