रायपूर - कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून देशातील शिक्षणव्यवस्थेत ढिसाळता आली आहे. वर्क फ्रॉम एज्युकेशनमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीक्षमेतवर आणि अभ्यासावरही परिणाम झाला आहे. त्यामुळेच, यंदाही 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत होती. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीला बगल देत परीक्षा ऑफलाईनच घेतल्या आहेत. आता, पुढील महिन्यात इयत्ता 10 वी आणि 12 च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले असून भूपेश बघेल हेच मुख्यमंत्री बनले आहेत. आता, या मुख्यमंत्र्यांनी 10 वी आणि 12 च्या परीक्षेत टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सैर घडवून आणण्याची घोषणा केली आहे. लवकरच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होईल. या निकालाची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यामुळेच, जे विद्यार्थी जिल्ह्यात टॉप करतील, त्यांना सरकारच्यावतीने हेलिकॉप्टरची सैर घडवून आणण्यात येईल, असे बघेल यांनी म्हटलं आहे.
हेलिकॉप्टर सैरमुळे त्यांना शासनानेच्यावतीने सन्मान मिळाल्याचे अधोरेखित होईल. त्यातून इतरही विद्यार्थी प्रेरणा घेऊन अभ्यास करतील, त्यांच्या स्वप्नांना पंख मिळतील, असे बघेल यांनी म्हटले. दरम्यान, आता महिला आणि ग्रामीण भागातील लोकांची कमाई वाढविण्यासाठी सरकार गोमुत्र खरेदी करणार आहे. या गोमुत्रावर प्रक्रिया करुन औषधे बनविण्यात येतील. त्यामुळे, ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही बघेल यांनी म्हटले. बघेल हे सध्या विविध विधानसभा मतदारसंघांचा दौर करत आहेत. या दौऱ्यात ते लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
दरम्यान, भुपेश बघेल यांनी त्यांच्या दौऱ्यात आज एका इंग्लिश स्कुलला भेट दिली. या भेटीत त्यांना इयत्ता दुसरीतील विद्यार्थीनीने हेलिकॉप्टरची सैर करण्याचा हट्ट केला. त्यावर, मुख्यमंत्री बघेल हेही अचंबित झाले होते. मात्र, त्यांनी त्या शाळकरी विद्यार्थीनीची इच्छा पूर्ण केली. तिला स्वत:च्या हेलिकॉप्टरमधून सैर घडवली.