आज कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो'साठी मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या रोड शो मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या जवळ एक व्यक्ती आल्याचे दिसत आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या व्यक्तीला बाजूला केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणताही चूक झाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या व्हिडिओमध्ये जेव्हा पीएम मोदी कारच्या बाहेर उभे राहून लोकांचे अभिवादन स्वीकारत आहेत, तेव्हा एक व्यक्ती वेगाने त्यांच्या दिशेने सरकत आहे. त्या व्यक्तीच्या हातात पुष्पहार आहे. मात्र तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ तेथून हटवले आणि पंतप्रधानांचा रोड शो सुरूच आहे. पीएम मोदींच्या सुरक्षेत कोणतीही कसूर झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आले आहेत. 'मंच विविध संस्कृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करतात. एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेलाही जोर मिळतो, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
'यावेळी हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची थीम 'विकसित युवक, विकसित भारत' अशी आहे. येथे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की दरवर्षी देश हा दिवस राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणून साजरा करतो. या दिवशी अनेक कार्यक्रमांमध्ये तरुणाईचा सहभाग असतो. हा महोत्सव पहिल्यांदा 1984 मध्ये सुरू झाला. तेव्हापासून दरवर्षी 12 जानेवारीला देशात राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो.
जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री, गुलाबराव पाटलांचा वंचितला टोला
याच भागात पंतप्रधान नरेंद्र मोदीही कर्नाटकात पोहोचले आहेत. कार्यक्रमापूर्वी त्यांच्या वतीने हा रोड शो काढण्यात आला आहे. रोड शोमध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.