नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पण, अनेक तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सतत नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आणि पर्यटनस्थळी किंवा बाजारात गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाजार आणि पर्यटनस्थळी होत असलेल्या गर्दीवर चिंता व्यक्त केली होती.
पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंतागेल्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिल स्टेशन, पर्यटनस्थळे आणि बाजारात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांमुळे चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, हे ठीक नाही. आपल्याला तिसरी लाट रोखायची आहे. कोरोना आपोआप जात नाही, तुम्ही बाहेर फिरुन त्याला घरी घेऊन जात आहात. जाणकारही म्हणत आहे की, गर्दीमुळे तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळा आणि गर्दी करु नका.