शबरीमला : केरळचे शबरीमलातील आय्यप्पा मंदिर शनिवारपासून दोन महिन्यांसाठी खुले झाले असून, सोमवारी सकाळीही भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. या मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश द्यावा या निकालाच्या फेरविचारास केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरात होणाºया घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हे मंदिर पुन्हा खुले झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत ७० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या मंदिर संकुलात भाविकांसाठी अपुºया सुविधा असल्याची तक्रार अनेकांनी केली. १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनाही आय्यप्पा मंदिरात प्रवेश द्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याला विरोध करण्यासाठी गेल्या वर्षी मंदिर परिसरात भाविकांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. भाविकांची बारकाईने तपासणी केल्यानंतरच पोलीस त्यांना मंदिरात प्रवेश देत होते. महिला भाविकांना निदर्शकांनी मंदिरात जाण्यापासून रोखले होते. मात्र, यंदाच्या वर्षी शबरीमला मंदिरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त नाही की भाविकांवर कोणतीही नियंत्रणे लादलेली नाहीत. या गोष्टीमुळे आय्यप्पाच्या दर्शनाला येणारे लोक खूश आहेत. तणावरहित वातावरणात दर्शन घेता येत असल्याचा आनंद भाविकांच्या चेहºयावर दिसत आहे. (वृत्तसंस्था)महिला भाविकांना संरक्षण नाहीशबरीमला मंदिर संकुल परिसरात रविवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या असंख्य भक्तांची तारांबळ उडाली. तेथील मुख्य पुजारी ए. के. सुधीर नम्बुतिरी यांनी सोमवारी पहाटे तीन वाजता विशेष पूजा केल्यानंतर आयप्पा मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. सर्व वयोगटाच्या महिलांना या मंदिरात प्रवेश देण्याबद्दलच्या आधीच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. असे असूनही आंध्र प्रदेशमधून आलेल्या महिला भाविकांपैकी १० ते ५० वर्षे वयोगटातील १० जणींना मंदिरात प्रवेश करण्यापासून शनिवारी रोखण्यात आले. केवळ प्रसिद्धीसाठी मंदिर प्रवेश करणाºया महिलांना संरक्षण न देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.
आय्यप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी; शबरीमलात तणाव नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 1:56 AM