खंडपीठाच्या मागणीसाठी मानवी साखळी
By admin | Published: October 03, 2015 12:20 AM
पुणे : उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे आणि रूपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित मिळावेत या मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती, पुणे जिल्हा बार असोसिएशनच व रूपी बॅकेच्या खातेदारांनी टिळक चौकात मानवी साखळी केली. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक ,वकील व खातेदार यांचा ऊत्सुपुर्त्त प्रतिसाद मिळाला.
पुणे : उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे आणि रूपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित मिळावेत या मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती, पुणे जिल्हा बार असोसिएशनच व रूपी बॅकेच्या खातेदारांनी टिळक चौकात मानवी साखळी केली. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक ,वकील व खातेदार यांचा ऊत्सुपुर्त्त प्रतिसाद मिळाला.खंडपीठाच्या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनच्यावतीने विविध माध्यमातून आंदोलन केले जात आहे. त्याला आता विधी पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापकांसह नागरिकांचेही सहकार्य मिळू लागले आहे. शुक्रवारी सकाळी खंडपीठ व रुपी बँकेच्या खातेदारांचे पैसे मिळण्याबाबत एकत्रितपणे मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणेकर खंडपीठा मागणी कृती समितीचे मिहीर थत्ते, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड गिरीश शेडगे, उपाध्यक्ष ॲड. योगेश पवार, हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार ॲड. साधना बोरकर, असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलींद पवार, ॲड. औदुंबर खुनेपाटील, ॲड. अशोक संकपाळ, ॲड. श्रीकांत अगस्ते, ॲड. मोहन वाडेकर, ॲड. गिरीश शिंदे, ॲड. सतीश पैलवान, ॲड. यशवंत खराडे, ॲड. गणेश लोळगे, ॲड. मंदार जोशी, ॲड. राम शरमाळे, ॲड. रमेश धर्मावत, ॲड. सचिन हिंगणेकर ॲड. नेहा ताकवले, विजय राजेशिर्के, ॲड. मंगेश लेंडघर यांच्यासह ज्येष्ठ वकील व नागरिक उपस्थित होते. यावेळी मिहीर थत्ते म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात वकीलांनी फार मोठी व महत्वाची भुमिका बजावली होती त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतात हे चांगले नाही. तसेच रूपी बॅंकेच्या गोरगरीब खातेदारांचे व जनतेच्या पैशाची ताबडतोब परतफेड करण्याची मागणी केली व दोशी संचालकांवर कारवाई ची मागणी केली. वकीलांची व जनतेची आता एकजुट झाली आहे व सरकारला दखल घ्यावीच लागेल, असे ॲड अध्यक्ष गिरीश शेडगे म्हणाले. यापुढे रूपी बॅकेचे खातेदार व पुणे बार असोसिएशन दोन्ही मागण्यांसाठी एकत्रीत पणे लढा देतील असे त्यांनी जाहीर केले. येत्या रविवार फरासखाना पोलीस ठाण्याजवळील हुतात्मा पुतळ्याचे जवळ व चौकात मानवी साखळी आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. -------------