शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

50 वर्षापूर्वी एअर इंडियाच्या विमानाला अपघात: मृतांचे अवशेष सापडले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 1:24 PM

फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्स येथे मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत. एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांचे हे अवशेष असण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देआल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्स येथे मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत.एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांचे हे अवशेष असण्याची दाट शक्यता आहे.

ग्रीनोबेल, दि. 29 - फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्क येथे मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त  विमानातील प्रवाशांचे असण्याची दाट शक्यता आहे. 50 वर्षांपूर्वी एअर इंडियाची दोन प्रवासी विमाने या भागात कोसळली होती.  विमान अपघातानंतर दुर्घटनास्थळी शोधकार्याची आवड असलेल्या डॅनियल रॉची यांचे बॉसन्स ग्लेशिअरमध्ये अनेकवर्षापासून शोधकार्य सुरु होते. गुरुवारी त्यांना हे अवशेष सापडले. 

यापूर्वी मला इतके स्पष्ट मानवी अवशेष सापडले नव्हते. यावेळी त्यांना हात आणि पायाच्या वरचा भाग सापडला आहे. जानेवारी 1966 मध्ये मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेले एअर इंडियाचे बोईंग 707 विमान माँट ब्लान्स इथे कोसळले होते. त्यावेळी विमानातील 117 जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 1950 साली याच भागात एअर इंडियाचे एक विमान कोसळले होते. त्यावेळी विमानात 48 जण होते. 

1966 सालच्या बोईंग 707 विमानातील महिला प्रवाशाचे हे अवशेष असू शकतात असू शकतात असे रॉची यांनी सांगितले. एका विमानाचे इंजिनही त्यांना सापडले आहे. अवशेष सापडल्यानंतर रॉची यांनी लगेच चॅमोनिक्स खो-यातील आपातकालीन कक्षाला माहिती कळवली. त्यांचे हेलिकॉप्टर तिथे आले व अवशेष आपल्यासोबत घेऊन गेले. आता तज्ञ त्या मानवी अवशेषांचा अभ्यास करतील. 

दहा दिवसांपूर्वी स्विस आल्प्स पर्वतराजीत दोन मृतदेह सापडले होते. डीएनए चाचणीवरुन त्या दोन मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. मार्सीलीन डयुमोयुलीन आणि त्यांची पत्नी फ्रानसाईन अशी त्या दोघांची नावे आहेत. 75 वर्षांपूर्वी दोघे आल्प्समध्ये बेपत्ता झाले होते. त्यावेळी मार्सीलीन (40) तर, त्यांची पत्नी फ्रानसाईन(37) वर्षांची होती. 

आल्प्समध्ये विमान अपघातात भारताने गमावला प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्क येथे 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडियाचे जे विमान कोसळले त्या विमानात भारताचे प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा सुद्धा होते. त्यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला. जिनेव्हा एअरपोर्ट आणि वैमानिकामध्ये विमानाच्या नेमक्या स्थानावरुन गैरसमज झाल्यामुळे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. 

- उंच शिखरावरील बर्फाला माँन्ट ब्लान्क म्हणतात. याच हिम शिखरावरुन एका जागतिक पेन कंपनीने माँन्ट ब्लान्क हे नाव धारण केले आहे. 

-माँट ब्लान्क हे आल्प्स पर्वतरांगा आणि युरोपातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून 4808 मीटर उंचीवर आहे. 

- नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून 8,848 मीटर उंचीवर आहे. 

- महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटले जाणारे कळसूबाई शिखर समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर आहे. 

- फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंड या तीन देशांमध्ये आल्प्स पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. 

...तर टाटा ग्रुप एअर इंडिया कंपनी खरेदी करेल टाटा ग्रुप लवकरच एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप हा सिंगापूर एअरलाइन्सचा सहभागीदार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, टाटा ग्रुपनं एअर इंडियाला खरेदी करण्याचा निश्चय केल्यास एअर इंडियाची पुन्हा घरवापसी होणार आहे. कारण एअर इंडिया ही कंपनी 1953ला राष्ट्रीयीकृत होण्याआधी टाटांच्या अधिपत्याखाली होती. 

रिपोर्टनुसार, टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केंद्र सरकारशी अनौपचारिक चर्चांमध्ये एअर इंडिया कंपनीत 51 टक्के भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकार एक दशकाहून अधिक काळ तोट्यात चाललेल्या या विमान कंपनीचं खासगीकरण करण्यासाठी सकारात्मक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाला पाठिंबा दिला होता. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असंही जेटलींनी त्यावेळी सांगितलं होतं. एअर इंडियाच्या डोक्यावर जवळपास 52 हजार कोटींचे कर्ज आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी 30 हजार कोटींचं बेलआऊट पॅकेजही मंजूर केलं आहे. त्यात 24 हजार कोटी एवढी रक्कमही देण्यात आली आहे.